जेलमध्ये नग्न होऊन धिंगाणा, सातारा पोलिसांना मारण्याचा प्रयत्न, गांजाप्रकरणातील परदेशींचा राडा

सातारा जिल्हा कारागृहात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाई येथील गांजा प्रकरणातील युवकांनी नग्र होत कारागृहातच धिंगाणा घातला.

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 15:25 PM, 24 Feb 2021
जेलमध्ये नग्न होऊन धिंगाणा, सातारा पोलिसांना मारण्याचा प्रयत्न, गांजाप्रकरणातील परदेशींचा राडा
सातारा वाई गांजा शेती आरोपी

सातारा : सातारा जिल्हा कारागृहात (Satara District jail) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाई येथील गांजा प्रकरणातील युवकांनी नग्र होत कारागृहातच धिंगाणा घातला. सातारा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असणारे वाईतल्या गांजा प्रकरणातील परदेशी युवकांनी जेलमध्ये तोडफोड केली तसंच आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाणीचा प्रयत्न केला. (attempts to Fight Satara police, foreign accused in Cannabis Cultivation)

कारागृहात विवस्त्र होत धिंगाणा

सातारा जिल्हयातील वाई येथे दोन परदेशी युवकांनी गांजाची लागवड केली. या प्रकरणात अटकेत असलेले दोन्ही परदेशी संशयितांनी जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातला असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न

आरोपांनी विवस्त्र होऊन धिंगाणा तर घातलाच पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी कारागृहातील सीसीटीव्ही देखील फोडला. या साऱ्या प्रकाराने कारागृहात एकच खळबळ माजली आहे.

दरवाजा- खिडक्यांची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न

कारागृहात असलेल्या दरवाजा आणि खिडक्यांची आरोपांनी तोडफोड केली. जेलमध्ये यथेच्छ तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी त्यांना जाब विचारला असता आरोपींनी पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रयत्न केला.

कारागृह प्रशासनाची आळीमिळी गूपचिळी

दुसरीकडे कारागृहात एवढा सगळा धिंगाणा होऊन देखील कारागृह प्रशासनाने याबाबत कुठेही वाच्छता केली नाही. टीव्ही मराठीने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कारागृह प्रशासनाने माहिती देण्यास नकार दिला आहे.

गांजा शेतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर

सातारा जिल्हयातील वाई येथील एका बंगल्यात परदेशी व्यक्तींनी गांजाची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित या परदेशी व्यक्तींनी गेल्या वर्षभरापासून या बंगल्यामध्ये गांज्याची शेती करून तयार केलेला हा अमली पदार्थ बाहेर विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी रात्री सातारा पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकला. यानंतर बंगल्यात गांजा पिकवण्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे.या बंगल्यात गांजा पिकवण्यासाठी अनेक आधुनिक तंत्राचा वापर हे परदेशी व्यक्ती करत होते ही बाब देखील समोर आली आहे.

पुण्यातील पथकाकडून माल सील

पुण्यातील अंमली पदार्थ तपासणी पथकाने हा सगळा माल सील करून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जे की परदेशी तरुण आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलंय. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

मात्र, अटकेवेळी या परदेशी व्यक्तींना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जात होतं त्यावेळी हे परदेशी व्यक्ती चित्रीकरण करणाऱ्या मीडिया प्रतिनिधीच्या अंगावर धावून जात होते. त्याचबरोबर हाताच्या बोटांच्या वेगवेगळ्या कृती करून शिव्या देखील देत होत्या. हा सगळा प्रकार पोलिसांच्या समोरच सुरू होता.

(attempts to Fight Satara police, foreign accused in Cannabis Cultivation)

हे ही वाचा :

पोलीस अधीक्षकांच्या घराजवळच दरोडा, चोरट्यांचं थेट धुळे पोलिसांना आव्हान

VIDEO | नांदेडमध्ये दोन गटात हाणामारी, तरुण गंभीर जखमी