AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | नांदेडमध्ये दोन गटात हाणामारी, तरुण गंभीर जखमी

हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Nanded two group fight video)

VIDEO | नांदेडमध्ये दोन गटात हाणामारी, तरुण गंभीर जखमी
नांदेडमध्ये दोन गटात हाणामारी
| Updated on: Mar 01, 2021 | 8:50 AM
Share

नांदेड : नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातील शिवणी जामगा गावात दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Nanded two group fight video viral)

नांदेडमधील हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे. या घटनेमुळे शिवणी जामगा शिवारात प्रचंड तणाव आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. जातीय वादातून ही घटना घडल्याचा आरोप एका गटाने केला आहे. त्यामुळे गावातील वातावरण चिघळलेलं आहे.

पाहा व्हिडीओ :

नाशिकमध्ये शिवजयंतीला दगडफेक

पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींची धिंड काढण्यात आली. नाशिकमधील देवळाली परिसरात धिंड काढण्यात आली. देवळाली परिसरात शिवजयंतीच्या रात्री दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींची नाशिकमधील देवळाली परिसरात धिंड काढण्यात आली.

शिवजयंतीला दगडफेक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने देवळाली पोलिस हद्दीत कर्तव्यावर असताना संसरी येथील चारणवाडी येथील एका इसमाबरोबर भांडण होऊन ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले, यावेळी चारणवाडी येथील सोनू जाधव हातात दगड घेऊन आला आणि अमोल जाधवला म्हणाला की पोलीस नाईक आहेर यांच्या डोक्यात दगड घाल, अशी फिर्याद पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिली.

आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. दगड डोक्यास लागल्याने आहेर यांच्यासह पोलीस शिपाई मनोहर साळुंखे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कोणावर कारवाई?

या प्रकरणी चारणवाडी येथून संशयित आरोपी शंकर सुरेश देवकर, श्रावण माने,  रोहित कुसमाडे, दीपक नलावडे, गुंडाप्पा देवकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, तर उर्वरित नऊ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सर्व आरोपींविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांनी कलम 307, 353 332, 333 ,141, 143,147 148,149, 120 ब आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

शिवजयंतीला पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींची नाशकात धिंड

(Nanded two group fight video viral)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.