संजय राऊत यांच्या सारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही, मनिषा कायंदे भडकल्या, थेट..

नुकताच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे चांगल्याच भडकल्या आहेत. यादरम्यान त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांना बोगस माणूसही त्यांनी म्हटले.

संजय राऊत यांच्या सारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही, मनिषा कायंदे भडकल्या, थेट..
Sanjay Raut Manisha Kayande
| Updated on: Aug 14, 2026 | 9:43 AM

संजय राऊत यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटावर होत असलेल्या टीकेवर मनिषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना थेट बोगस म्हटले. मनिषा कायंदे यांनी म्हटले की, संजय राऊत सारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही. अरे ज्याने निवडणुकीचा फाॅर्म भरला नाही, साधी निवडणुक लढली नाही तो सांगणार शिंदेंना पक्ष विकला?  एकनाथ शिंदे यांच्यामुळेच संजय राऊत राज्यसभेवर गेले, आमच्या मतांवर ते निवडून आले, असाही मोठा दावा त्यांनी केला. यासोबतच पुढे त्यांनी म्हटले की, तुमच्या बाजूने निकाल लागला की आयोग चांगला नाहीतर वाईट, शिव्या देणाऱ्या वेढ्याशी त्याची तुलना करावी. शिव्या शाप देण्याचं काम सध्या सुरू आहे.

बाहेरचा पक्ष वेगळा आतला पक्ष वेगळा असं हे सांगतात, लाखोंच्या संख्येत कार्यकर्ते, नेते एकनाथ शिंदेंसोबत आले.  कपिल सिब्बल यांना पगार मिळतो ते इमोशनल आरोप करतात.  विधानसभेचा विषय असला की कोर्ट सांगतं की निर्णय विधानसभा किंवा लोकसभा घेणार, कोर्ट यापुराव्यांवर चालतं… फक्त आरोप केले सिद्ध काहीच केले नाही.

कोर्ट काय निर्णय देईल हे सांगता येत नाहीत. उबाठाकडून सुरूवात झालीये… सध्या वातावरण निर्मिती चुकीची केली जात आहे. अगोदरच निर्णय देऊन मोकळे होत आहेत. एकनाथ शिंदे आजारी असतील म्हणून कदाचित गेले नसतील पण याबाबत फार जास्त माहिती नाही. महामंडळ व्हावं अशी इच्छा आहे. पालकमंत्रिपद मिळावं ही देखील अपेक्षा आहे.

दोघांमधील ही हमरी तुमरी आहेत… सुषमा अंधारे एकच विचारवंत ठाकरेंकडे आहेत. हिंदुत्वाच्या गमजा मारणारे उद्धव ठाकरेंना वडिलांना अपशब्द काढणारे इतरांच्या अंगावर जाणारे चालतात. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कोर्टात सुरू आहे. यादरम्यानच कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. काही दावे त्यांनी केले. निवडणूक आयोग्यावर गंभीर आरोपही करण्यात आलीत. निवडणूक आयोगाने आपल्या कक्षाबाहेर जाऊन काम केल्याचे त्यांनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us