तर खबरदार… मनोज जरांगे पाटलांनी थोपाटले दंड; म्हणाले, पुन्हा तुम्हाला रस्त्यावर

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपले असून त्यांच्यावर संभाजीनगरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरून सरकारला थेट मोठा इशारा दिला आहे.

तर खबरदार... मनोज जरांगे पाटलांनी थोपाटले दंड; म्हणाले, पुन्हा तुम्हाला रस्त्यावर
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 04, 2025 | 12:15 PM

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी मागील काही महिन्यांपासून संघर्ष करत आहेत. नुकताच त्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण झाले. शेवटी सरकारने जरांगे यांच्या सहा मागण्या मान्य करत थेट जीआर काढला. हा मराठा समाजाचा मोठा विजय ठरला. एका लाखापेक्षाही जास्त लोक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत दाखल झाले होते. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातली जीआर काढला आहे. मात्र, अनेकांकडून संशय व्यक्त केला जातोय. आता यावरच बोलताना जरांगे पाटील हे दिसत आहेत.

जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले की, मीच मराठ्यांना ओबीसीमध्ये घालणार आहे. माझा मुद्दा आरक्षण आहे. कोणी कितीही संभ्रम केला तरीही माझा समाज हा माझ्यावर विश्वास ठेवतो. ते कोणावरही विश्वास ठेवत नाहीत आणि मी पण कोणावर विश्वास ठेवत नाही. मी मराठवाड्यातील सगळ्या मराठा आरक्षणात घालणार. सरकारने सातारा गॅझेटबद्दलही हयगायी करायला नाही पाहिजे. मी थोडे दिवस म्हणतो महिने वगैरे काही नाही.

जर हे झालं नाही तर मी तुम्हाला पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करेल. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही बोलताना मनोज जरांगे पाटील हे दिसले आहेत. जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने आरोप केली जात आहेत, यावर बोलताना जरांगे हे दिसत आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, शिंदे हा खूप जास्त चांगला माणूस आहे आणि तो कधीही असे करू शकत नाही.

देवेंद्र फडणवीस यांचे पद धोक्यात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या डाव टाकल्याचा आरोप हा सातत्याने केला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलचा जीआर सरकारने काढल्याने ओबीसींमध्ये संतापाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये ओबीसी समाजाचे लोक उपोषणाला बसले आहेत. नागपूरमध्ये मोठे उपोषण ओबीसी समाजाचे सध्या सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.