AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली, डॉक्टरांनी दिला असा सल्ला

Manoj Jarange Patil Health Update: सततचे जागरण आणि दगदगीमुळे आता त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या अंगात ताप आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे ग्लॅलेक्सि हॉस्पिटलच्या पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली, डॉक्टरांनी दिला असा सल्ला
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Oct 30, 2024 | 1:21 PM
Share

Manoj Jarange Patil Health Update: मराठा आरक्षण आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका बजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा समाजातील तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचे सांगितले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दौरे आणि भेटीगाठी सुरु आहेत. अनेक इच्छूक त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. सततचे जागरण आणि दगदगीमुळे आता त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या अंगात ताप आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे गॅलेक्सी हॉस्पिटलच्या पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असली तरी उद्या होणारी दलित, मुस्लिम आणि मराठा समाजाची महत्त्वाची बैठक ते घेणार आहेत. ही बैठक महत्वाची असल्याने राज्यभरातील मराठा समाज आणि त्यांच्या समर्थकांनी आंतरवाली सराटीकडे येऊ नये असे आवाहन जरंगे पाटील यांनी केले आहे. उद्याची बैठक झाल्यानंतर या बैठकीत जो काही निर्णय होईल, तो दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कळवण्यात येईल. या निर्णयात मग उमेदवार उभे करायचे का पडायचे असो, जो काही निर्णय होईल त्या संदर्भात जरांगे पाटील पाडव्याच्या दिवशी समाजाशी संवाद साधतील.

धर्मगुरुंची 31 ऑक्टोबर रोजी बैठक

मनोज जरांगे यांची प्रकृती बरी नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण न देणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांच्या विरोधात ते मैदानात उतरले आहेत. आता त्यांनी 31 तारखेला मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीत विविध धर्माचे धर्मगुरु आहे. हेलिकॉप्टर आणि विमानाने महत्त्वाचे धर्मगुरू येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर मराठा समाज बांधवांनी 31 तारखेला अंतरवाली सराटीत येऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मराठा- मुस्लिम एकत्र आणणार

मनोज जरांगे यांनी मराठा आणि मुस्लिमांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते 31 ऑक्टोबरला अधिकृत फायनल बैठक घेणार आहे. त्या बैठकीनंतर कोण उमेदवार आणि कोणता मतदार संघ यासंदर्भातील अंतिम निर्णय देणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे म्हणाले, पुन्हा पुन्हा सांगतो मराठा मुस्लिम झाल्याशिवाय मज्जा नाही. एका जातीवर या राज्यात कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही.

विधानसभेत दलित, मुस्लिम, मराठा एकत्र आले तर सगळे आमचे निवडून येणार आहेत. कधी चेहरा न बघितलेले शेतकऱ्याचे मुले आमदार असतील. मुसलमान समाजातील मुले तुम्हाला आमदार अन् मंत्री झालेले दिसतील. पण हे सुंदर स्वप्न बघण्यासाठी समीकरण जुळले पाहिजे, दलित, मुस्लिम, मराठयांनी शहाणे होणे गरजेचं आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.