भाजपा ते काँग्रेस, आमदार-खासदारांचा जरांगेंना वाढता पाठिंबा, जाणून घ्या कोण-कोणत्या नेत्यांनी घेतली भेट!

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील गर्दी कमी करण्याचे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी नुकतेच शिंदे समितीने त्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. तसेच मराठवाड्यातील मराठा कुणबीच आहे, तसे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला असून राजकीय नेत्यांकडूनही त्यांना मिळत असलेला पाठिंबा वाढत आहे. आतापर्यंत त्यांना अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला असून यात भाजपाच्याही एका आमदाराचा सहभाग आहे.

भाजपा ते काँग्रेस, आमदार-खासदारांचा जरांगेंना वाढता पाठिंबा, जाणून घ्या कोण-कोणत्या नेत्यांनी घेतली भेट!
manoj jarange patil
| Updated on: Aug 30, 2025 | 4:17 PM

Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात त्यांचे उपोषण चालू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत लाखो मराठा आंदोलक मुंबईत जमा जाले आहेत. पुढच्या काही दिवसांत गावागावातील मराठा समाज मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील गर्दी कमी करण्याचे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी नुकतेच शिंदे समितीने त्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. तसेच मराठवाड्यातील मराठा कुणबीच आहे, तसे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला असून राजकीय नेत्यांकडूनही त्यांना मिळत असलेला पाठिंबा वाढत आहे. आतापर्यंत त्यांना अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला असून यात भाजपाच्याही एका आमदाराचा सहभाग आहे.

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे लोकप्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

आमदार विजयसिंह पंडित
आमदार राजेश विटेवर
आमदार प्रकाश सोळंके

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

आमदार संदीप क्षीरसागर
आमदार अभिजीत पाटील
खासदार बजरंग बाप्पा सोनवणे
खासदार भगरे गुरुजी
खासदार निलेश लंके

शिवसेना (शिंदे गट)

आमदार हिकमत उडाण

शिवसेना ठाकरे गट

आमदार कैलास पाटील
आमदार प्रवीण स्वामी
खासदार ओमराजे निळंबळकर
खासदार नागेश पाटील आष्टीकर

भाजप

आमदार सुरेश धस

काँग्रेस

माजी आमदार विक्रम सावंत

दरम्यान, नुकतीच मनोज जरांगे आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढावा. मी या मागणीला मुदत द्यायला तयार नाही. एका मिनिटाचाही वेळ मिळणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तर जरांगे यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी दिलेला संदेश घेऊन शिंदे समिती थेट मराठा आरक्षणविषय मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घ्यायला गेले आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.