AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे ॲक्शन मोडमध्ये, मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारताच मोठा निर्णय, रात्रीतून सूत्र हालणार, अंतरवालीतून मोठी बातमी

आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच आता जरांगे पाटील यांंनी मोठा निर्णय घेतला आहे.

जरांगे ॲक्शन मोडमध्ये, मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारताच मोठा निर्णय, रात्रीतून सूत्र हालणार, अंतरवालीतून मोठी बातमी
manoj jarange Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 9:51 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 15 सप्टेंबरला मराठा बांधव अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. परंतु त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी आता हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने सहकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्याकडून मुंबईत आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी पुन्हा एकदा नवीन अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परवानगीसाठी तात्काळ अर्ज करा, नियम आणि अटीच्या कागदावर सह्या करण्यासाठी रात्रीतून तो कागद पाठवा, अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर गंगाधर काळकुठे यांच्याकडून परवानगीसाठी नवीन अर्ज करण्यात आला आहे.

दरम्यान सोमवारी दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे.  या पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. परवानगी नाकारल्याने जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. उद्या मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरकारसमोरील पेच वाढण्याची शक्यता आहे.  दरम्यान नव्या अर्जानंतर तरी जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे आज वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी दोन दिवसांपासून सलाईन घेणं बंद केलं आहे, तसेच त्यांनी आता पाणी पिणं देखील बंद केलं आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच