Manoj Jarange Patil : मनोज जरांगे 500 कोटीनंतर आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार; फडणवीस सरकारला थेट… मनातलं सगळं सागून टाकलं

manoj jarange patil : मनोज जरांगे यांनी आणखी का ही ऑडिओ बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे 500 कोटीनंतर आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार; फडणवीस सरकारला थेट... मनातलं सगळं सागून टाकलं
manoj jaragne News
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 7:37 AM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा अद्याप तपास सुरू आहे. खरंतर या ऑडिओ बॉम्बवरून आधीच राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा फडणवीस सरकारला दिला आहे. माझ्याकडे फक्त चार ऑडिओ क्लिप नाहीत. तर खूप साऱ्या ऑडिओ क्लिप असल्याचे सांगून मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारला मोठा इशारा दिला आहे.

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृत अवस्थेत आढळलेले शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या नांदेड येथील घरी जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. मनोज जरांगेंनी त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध मंत्र्यांना फोन लावले. त्यानंतर चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबियांची जबाबदारी निश्चित करायला लावली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘माझ्याकडे फक्त चार ऑडिओ क्लिप नाहीत. खूप सार्‍या ऑडिओ क्लिप आहेत. जर पैसे देऊन मराठ्यांचे लोक फोडायचे आणि माझ्या मागे लावायचे हे जर षडयंत्र बंद केलं नाही, तर काही दिवसात आणखीन ऑडिओ बॉम्ब फोडणार आहे’.

Loading...

‘ पैसे देऊन बोलायला लावतात हे मराठ्यांसमोर उघड झालं आहे. मी माझ्या समाजासाठी का बरं काम करू नये, ही लोक माझ्यावर एवढं का जळतात. माझ्या समाजाच्या लेकरांनी शिक्षणात नोकऱ्या त का बरं जाऊ नये. तुमचं जर काही गैर असेल, तर माझ्यासोबत आहे. तुम्ही माझ्या समाजाला का बरं वेठीस धरताय, माझ्या समाजाच्या लेकरांचा एवढा द्वेष का करताय, हा माझा मूळ प्रश्न आहे.  त्यांचं म्हणणं आहे की, मी त्यांच्या बाजूने बोलावं. मी तुमच्या बाजूने का बोलावं, माझ्या मायबाप समाजाचा वाटोळं करून तुमच्याकडून बोलू का, मी मरण पत्करेन, पण तुमच्यासारखा समाजाला धोका देऊन  राहणार नाही. मी सरकारकडून राहणार नाही, मी माझ्या समाजाचाच राहील.  2029 रोजी मला काही लोकांची जिरवायचीय.  अनेक जणांची जिरवायची आहे. आम्हाला आमचे लेकरं सुद्धा जगवायची आहेत’, असं जरांगे म्हणाले.

‘तुम्हाला पुढील निवडणुकीत कुणाची जिरवायची, असा सवाल केल्यानंतर जरांगे म्हणाले, आता वेळ येऊ द्या,आत्ताच यांना सावज करणं चांगलं नाही.  आमची रद्द केलेली, प्रमाणपत्र द्या, जे प्रमाणपत्र तुम्ही थांबवले ते पण द्या, व्हॅलिडीटी पण द्या. हैदराबाद गॅझेटीयरनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करा. तुम्ही सातारा संस्थान,कोल्हापूरचा जीआर काढा, तुमचे आमचे संबंध पहिल्यासारखे होतील. पण तुम्ही नाही देत म्हणल्यावर, आम्ही तुम्हाला इतकी ताकद दिलेली आहे. तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलोय. आमचं हाय म्हणून काय बोकांडीवर घ्यावं का, आमचा जर आमचं वाटोळच करणार असला, तर आमचं कोणत्या मराठ्याचं रक्त आहे मग, तुम्ही भाषणात स्वाभिमानाच्या गप्पा मारता, तुम्हाला नेमका कोणता स्वाभिमान आहे, तुम्ही सगळे प्रमाणपत्र द्यायचं थांबवले, तर तुमचं काही वैर असेल तर माझ्याशी करावे, गोरगरीब लेकरांच्या कशाला तळतळाट घेताय, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, मी तुम्हाला सोडणार नाही, असे जरांगे पाटील पुढे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us