Manoj Jarange Patil : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोप, जरांगे पाटलांनी पुरावा कधी देणार त्याचा टायमिंग सांगितला

Manoj Jarange Patil : काल दसरा मेळाव्यात बोलताना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन मोठा आरोप केला होता. एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले होते.

Manoj Jarange Patil : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोप, जरांगे पाटलांनी पुरावा कधी देणार त्याचा टायमिंग सांगितला
Manoj jarange patil-Eknath Shinde
| Updated on: Oct 21, 2026 | 12:13 PM

काल नारायण गडावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी मराठा समाज अजून भक्कम, मोठा झाला पाहिजे असं उपस्थितांना आवाहन केलं. या मेळाव्यातचं बोलताना त्यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला. एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपंकडून 500 कोटी रुपये घेतले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात किंवा आज पर्यंत यावर खुलासा करावा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. आज मनोज जरांगे पाटील टीव्ही 9 मराठीशी बोलले. त्यावेळी उद्या 11 वाजता एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे देणार असं म्हटलं.

“मागून वाकडं करु शकत नाही. एवढ मी माझ्या समाजासाठी लढतोय. तो विषय सोडून द्या. पण मी उद्धवस्त होणार नाही, एवढा मराठा लेचापेचा नाही. त्याची काळजी करु नका. मी पाठपुरावा करु शकतो. मी आधी कोणाबद्दल बोलत नाही. पण पुढे येऊन कोण बोललं, तर मी सोडत नाही. कारण माझ्या समाजाच्या अस्तित्वाचा विषय आहे. तुम्ही समाज उद्धवस्त केलाय रे तुमच्यासाठी” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “राणेंदादांचा विषय घ्या मोठ्या. मी त्यांना कधी बोललो नाही. त्यांच्या मुलांना बोललो. तसचं रामदासभाईंना सुद्धा बोललो नाही. एकेकाळचा चांगल्या प्रकारे भगव्यासाठी लढत होते. लहान असताना ऐकून आहोत, चांगला लढणारा माणूस. त्यामुळे मी काही बोलणार नाही. पण पुरावे पाहिजेत ना, उद्या 11 वाजता प्रेस घेऊन देतो” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

Loading...

त्यानंतर मग त्याला उत्तर द्या

“माझी आपणाला विनंती आहे की, आपण मराठा समाजाचे आहात. कुठे काय कुजबूज होते आहे याकडे लक्ष देऊ नका. ज्याच्यात हिम्मत असेल तो बोलेल, त्यानंतर मग त्याला उत्तर द्या” असं आवाहन रामदास कदम यांनी मनोज जरांगेंना केलं. मनोज जरांगे पाटील यांनी काल दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केलं होतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us