
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे, मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हाय कोर्टानं त्यांना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली होती, मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनाची परवानगी मिळाली आहे, मात्र त्याचबरोबर काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे, मात्र आंदोनाच्या एक दिवस आधीच मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला होता, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होणार होतं. मात्र हाय कोर्टानं त्यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र सोबतच काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत
काय आहेत नेमक्या या अटी?
पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला फक्त एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. शनिवार, रविवार आणि शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला कोणतीही परवानगी नसेल असं या आदेशात म्हटलं आहे. आंदोलनस्थळी ठराविक वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. वाहनतळासाठी वाहतूक पोलिसांशी विचारविनिमय करून परवानगी देण्यात येईल, असं या आदेशात म्हटलं आहे. या मैदानामध्ये आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार पाळणे बंधनकारक असणार आहे, तसेच आझाद मैदानाची केवळ 7 हजार स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे, असं या अटींमध्ये म्हटलं आहे. दरम्यान या अंटीमुळे आता मराठा आरक्षण आंदोलकांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंदोलनासाठी केवळ फक्त एकच दिवस परवानगी देण्यात आली आहे.