एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाने 500 कोटी घेतले नसतील, तर…; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. जर 500 कोटी घेतले नसतील, तर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे शांत बसणार नाहीत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवरून भाजप-शिंदे गटातच संघर्ष निर्माण झाला आहे. 500 कोटींच्या दाव्यावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपकडून मिळालेले 500 कोटी श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जरांगेंना दिल्याचा दावा करण्यात आलाय. परंतु मनोज जरांगेंनी 500 कोटी मिळाले नसल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे आता 500 कोटी हडप केले, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. या वादादरम्यान मनोज जरांगे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांनी 500 कोटी घेतले नसतील, तर शांत बसणार नाहीत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘आता दिल्लीच्या वाऱ्या वाढणार’
मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत ऑडिओ क्लिप प्रकरणावर भाष्य केलं. जरांगे म्हणाले, ‘महायुतीच्या नेत्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या होऊ शकतात. आमच्या विरोधात राळ उठवू शकतात. महाराष्ट्रातील जनतेने सावध व्हावं. वेगळं वळण देऊ शकतात. शिंदे गटाच्या लोकांकडून लोक फोडणे सुरू आहे. फडणवीसांच्या माणसांकडूनही तेच सुरू आहे. आता दिल्ली वाऱ्या सुरू होतील. यांना गरीबांचं देणेघेणं नाहीय. हे सत्य स्वीकारत नाही’.
…तर ते शांत बसणार नाहीत; मनोज जरांगे
‘एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा त्यांच्या मुलाने (Shirkant shinde) पैसे घेतले नसतील, तर शांत बसणार नाहीत. ते राजकारण उडत गेले म्हणतील. प्रतिमेला धक्का बसत असेल, तर राजकारण कधीही होऊ शकतं. प्रतिमेला धक्का बसला, तर एक ते दीड कोटी मराठा धक्का देतील. शिंदे हे खोट्याचे साथ देताय, म्हणून हा शिंदेंना धक्का बसेल. त्यामुळे मला वाटत नाही की हे गप्प बसतील. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाने पैसे घेतले नसतील, तर दोघे शांत बसणार नाहीत. आता भाजपने दिले नसतील, तेही गप्प बसणार नाहीत, असे जरांगे पाटील पुढे म्हणाले. दुसरीकडे आता या प्रकराच्या मुळाशी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जातील, असा विश्वास देखील जरांगेंनी व्यक्त केला.