AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : ‘लय बेकार होईल, तुझ्यामुळे अजित पवारचा पण कार्यक्रम लावेन’ मनोज जरांगेंचा कोणाला इशारा?

Manoj Jarange Patil :"शहाणा असशील तर हातातून वेळ गेलेली नाही. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. छगन भुजबळच ऐकून माझ्या जातीच्या नादी लागू नको. तुझ्या राजकीय करिअरचा देव्हारा करुन टाकेन. राजकारणातून तुमचं नामोनिशाण जाईल"

Manoj Jarange Patil :  'लय बेकार होईल, तुझ्यामुळे अजित पवारचा पण कार्यक्रम लावेन' मनोज जरांगेंचा कोणाला इशारा?
Manoj Jarange Patil
| Updated on: Oct 03, 2025 | 11:34 AM
Share

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांना इशारा दिला. धनंजय मुंडेंना थेट राजकारण संपवण्याची धमकी दिली. धनंजय मुंडे म्हणाले की, मराठा समजाला आरक्षण दिलं, याचा आनंद आहे. पण ओबीसीमधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का हवं? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रतिप्रश्न केला. तुम्ही का घेतलं बंजारा समाजातून? नाही घ्यायच, कशाला घेतलं?. कशाला लोकांच्या काड्या करतो. मला काय बोलतो हेकन्या, आम्ही ओबीसीच खातो, मग तू बंजारा समाजाच का खातो? तू दिसतो का त्यांच्यासारखा?” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.

तू माझ्या नादी लागू नको. त्याला एकदाच सांगतो, माझ्या नादी लागू नका. शहाणपणा करायचा नाही. दादा फादा मी मोजती नसतो. रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्यावर, माझ्या जातीवर बोलायचं नाही. माझ्या नादालालागला तर दोघांचा बाजार उठवेन. छक्के-पंजे माझ्यासोबत खेळू नको. तुझ्यामुळे अजित पवारचा पण कार्यक्रम लावीन. मी जातीला कट्टर मानणारा आहे. ऐकून घेतोय म्हणून शहाणपणा करायचा नाही. तो ज्याच्या प्रचाराला जाणार, त्या सीट पाडणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

असे प्रश्न मला नका विचारु, मी त्यांना मोजीत नाही’

पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्या ताटातलं घेऊ नका, त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही लोकांच्या ताटातलं ओरबाडून खाता. तुम्ही ज्ञान शिकवता, तुम्ही बिचाऱ्या त्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या. लोकांच वाटोळं केलं, काय ज्ञान शिकवता?” लक्ष्मण हाकेंवर प्रश्न विचारताच, असे प्रश्न मला नका विचारु, मी त्यांना मोजीत नाही असं उत्तर मनोज जरांगेंनी दिलं.

तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही

धनजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली. त्यावर सुद्धा मनोज जरांगे आक्रमकपणे बोलले. तू किती हुशार आहे माहित आहे, तुला पुन्हा एकदा सांगतो माझ्या नादी लागू नको. शहाणा असशील तर हातातून वेळ गेलेली नाही. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. छगन भुजबळच ऐकून माझ्या जातीच्या नादी लागू नको. तुझ्या राजकीय करिअरचा देव्हारा करुन टाकेन. राजकारणातून तुमचं नामोनिशाण जाईल. लय बेकार होईल, मराठा संपवून टाकतील, त्यांनाही पाडतील. मराठे हुशार झालेत. आता मराठ्यांनी कडवट रहायचं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.