मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून थेट ICU मध्ये ॲडमिट करण्याचा सल्ला

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली असून, मनोज जरांगे पाटील यांना ICU मध्ये ॲडमिट करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून थेट ICU मध्ये ॲडमिट करण्याचा सल्ला
Manoj Jarange Patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 1:11 PM

मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली असून, मनोज जरांगे पाटील यांना ICU मध्ये ॲडमिट करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं 19 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांनी 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबईतील उपोषणाची तारीख जाहीर केली. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे प्रस्तान केलं आहे. परंतु उपोषणामुळे वाटेतच त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली असून, त्यांना आयसीयूमध्ये ॲडमिट करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

डॉक्टरांनी काय म्हटलं? 

वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली आहे. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली आहे. शुगर आणि बीपी कमी झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया येत नाहीये, प्रतिक्रिया जास्त खालावली आहे, त्यामुळे त्यांना आता तातडीने उपचाराची गरज आहे.  त्यांना तातडीने आयसीयूमध्ये ॲडमिट केलं पाहिजे, सलाईन लावून पुढचा प्रवास करता येणार नाही.  बऱ्यापैकी डिहायड्रेशनचा त्रास आहे, अशी माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार? याकडे सर्वंचं लक्ष लागलं आहे.

उपोषणाचा 19 वा दिवस

दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. सलग 19 दिवसांपासून त्यांचं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू आहे. मात्र आता प्रकृती खालावली आहे. त्यांनी मुंबईत उपोषणाची घोषणा केली होती. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. आज त्यांचा  मुक्काम हा अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथे असणार आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us