Radhakrishna Vikhe | राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले, पण त्यांनी सहकाराबद्दल काहीच नाही केले; विखे-पाटलांचे शरसंधान

राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले. ते सहकाराबद्दल बोलले. मात्र, त्यांनी काहीच काम केले नाही, अशा शब्दांत शनिवारी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरसंधान साधले.

Radhakrishna Vikhe | राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले, पण त्यांनी सहकाराबद्दल काहीच नाही केले; विखे-पाटलांचे शरसंधान
राधाकृष्ण विखे-पाटील.
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 2:06 PM

प्रवराः राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले. ते सहकाराबद्दल बोलले. मात्र, त्यांनी काहीच काम केले नाही, अशा शब्दांत शनिवारी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरसंधान साधले. त्यांच्या बोलण्याचा रोख कोणावर आहे, हे मंचावरील मान्यवरांनी ओळखून गालातल्या गालात किंचित स्मितहास्य केले. विखे-पाटील प्रवरा येथे बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, (Amit Shah) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात बैलगाडी आणि नांगर यांची प्रतिकृती देत अमित शहा यांचा सन्मान करण्यात आला.

शहांचे केले कौतुक

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुरुवातीला उपस्थितांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, सहकाराच्या पंढरीत आज सोन्याचा दिवस आहे. या सहकार पंढरीत अमित शहा यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कोविडनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी सभा होत आहे. आपण सहकार मंत्री झालात आणि सहकार चळवळीला ताकद मिळाली, अशा शब्दांत त्यांनी यावेळी शहा यांचे कौतुक केले. देशासमोर प्रवरा कारखाना हे मॉडेल असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

त्यांच्याकडून सहकाराला दोष…

विखे-पाटील पुढे म्हणाले की, मधल्या काळात सहकार सहकार चळवळीची पीछेहाट झाली आहे. मात्र, आता आपण सहकार मंत्री झाल्याने नवी संजीवनी मिळेल, असा आशावाद त्यांनी अमित शहा यांच्याकडे पाहून व्यक्त केला. राज्यातील सहकारी कारखानदारीचे खासगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेकांनी खासगी कारखाने काढले आणि सहकाराला दोष दिला, असे म्हणत त्यांनी नाव न घेता टोलेबाजी केली.

त्यांनी काहीच नाही केले…

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, खरे तर राज्यातल्या सहकार चळवळीला आधार देण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला जीवदान दिले आहे. राज्यातले अनेक नेते केंद्रात केले. ते फक्त सहकारावर भरभरून बोलले. मात्र, त्यांनी सहकाराबद्दल काहीही केले नाही, अशी टीका त्यांनी कोणाचेही नाव न घेता केली. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोख कोणावर आहे, हे मंचावरील मान्यवरांनी ओळखून गालातल्या गालात किंचित स्मितहास्य केले.

मान्यवरांचा गौरव

प्रवरा येथील कार्यक्रमात गृहमंत्रीअमित शहा यांच्या हस्ते हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या आणि बीज बँकेच्या राहीबाई पोपरे यांचा गौरव करण्यात आला. राहीबाई यांचा पैठणी, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी राहीबाई आणि पोपटरावांची अमित शहा यांना ओळख करून दिली. दरम्यान, यावेळी रमेश धोंगडे यांचा साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांचा अमित शहा यांनी एक लाखाचा चेक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

इतर बातम्याः

Ramdas Kadam| कदमांचे 5 वार; शिवसेना संपवण्याची हरामखोरी मंत्र्यांकडून सुरू, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कारवाईची मागणी

VIDEO: सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं त्याचं वाईट वाटलं; रामदास कदम यांची नेमकी खदखद काय?