VIDEO: सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं त्याचं वाईट वाटलं; रामदास कदम यांची नेमकी खदखद काय?

आम्हा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद देऊ नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतरही सुभाष देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं.

VIDEO: सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं त्याचं वाईट वाटलं; रामदास कदम यांची नेमकी खदखद काय?
ramdas kadam
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 18, 2021 | 1:34 PM

मुंबई: आम्हा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद देऊ नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतरही सुभाष देसाई यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्याचं दु:ख झालं. देसाईंना मंत्रिपद द्यायला नको होतं, अशी खदखद शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. कदम यांनी ही खदखद व्यक्त करतानाच अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरही सवाल केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप खोडून काढतानाच अनिल परब यांच्यामुळे पक्ष रसातळाला जात असल्याचंही स्पष्ट केलं. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. आमचे वय 60-70 वर्ष झाली आहेत. आता आम्हाला मंत्रिपद देऊ नका, असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, नक्की?. मी त्यांन हो साहेब म्हणालो. पण जेव्हा मंत्र्यांची लिस्ट पाहिली, तेव्हा त्यात सुभाष देसाईंचं नाव होतं. देसाईंचं नाव पाहून मला वाईट वाटलं. दु:ख झालं. मला मंत्रिपद दिलं नाही म्हणून वाईट वाटलं नाही. तर ज्येष्ठांना मंत्रिपद देऊ नका अशी विनंती केल्यानंतरही मंत्रिपद दिल्या गेल्याचं वाईट वाटलं, असं कदम म्हणाले.

महिनाभरात पुढचा निर्णय घेणार

यावेळी कदम यांनी शिवसेनेला राजकीय धक्का देण्याचेही संकेत दिले. पुढे काय करायचं त्याचा निर्णय घेणार आहे. माझी मुलं आणि समर्थकांसोबत चर्चा करून निर्णय घेईल. महिन्याभरात पत्रकार परिषद घेऊन मी निर्णय जाहीर करेल. अन्याय सहन करण्याला मर्यादा असतात. आता हे सहन होण्याच्या पलिकडे गेलं आहे. मला माझ्या मुलांच्या भवितव्याचीही चिंता आहे. त्यांचं करिअर आता कुठे सुरू झालं आहे, असं सांगतानाच मी मात्र शिवसेना सोडणार नाही. माझी पक्षातून हकालपट्टी केली तरी मी भगव्याशीच जोडून राहील, असं त्यांनी सांगितलं.

परब यांच्या डोक्यात हवा गेलीय

माझ्यामुळे मी पक्षाला कोणताही त्रास होऊ देणार नाही. नगर परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यावर पुढचा निर्णय घेईल. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही गद्दारी करणार नाही, असं सांगतानाच उद्धव साहेबांना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही या प्रकरणात लक्ष घाला. अनिल परब यांच्या डोक्यात मस्ती गेलीय. हवा गेली. त्यांचे पाय जमिनीवर नाही. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात परब यांना हरामखोर म्हटलं. या हरामखोराला आवरा, असं म्हटलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

परबांचा बाप काढला

या पुढे आमदारांना निधी देणार नाही असं परब म्हणाले होते. हा काय अनिल परब यांच्या बापाचा पैसा आहे का? तुम्ही शपथ घेतली त्याचा भंग केला. मी बघेन. उद्धवजींना विचारून घे…तो जिल्हा नियोजन निधीचा पैसा आहे. तुझा नाही. आमदारांचा हक्क आहे. तो निधी मिळाला नाही तर मी कोर्टात जाईल, असा इशाराच त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, परब हे खेडेकर-कदम यांचे ‘महात्मा गांधी’; रामदास कदम यांचा हल्लाबोल

Ramdas Kadam| कदमांचे 5 वार; शिवसेना संपवण्याची हरामखोरी मंत्र्यांकडून सुरू, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कारवाईची मागणी

Shivaji Maharaj Statue | ‘विटंबना छोटी गोष्ट! ‘छत्रपतींच्या पुतळ्यावरील वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं धक्कादायक विधान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें