जरांगेंवर क्रेनमधून गुलालाची उधळण, संपूर्ण शरीर गुलालाने माखलं, अंतरवलीत महिलांकडून भव्यदिव्य स्वागत; गावात येताच दिला हा इशारा

मुंबईच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील हे आज पहिल्यांदाच त्यांच्या अंतरवाली सराटी गावात गेले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत गावकऱ्यांनी केले. यावेळी क्रेनच्या माध्यमातून गुलाला त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. अंतरवाली सराटी गावात आज दिवाळी असल्याचे जरांगे यांनी म्हटले.

जरांगेंवर क्रेनमधून गुलालाची उधळण, संपूर्ण शरीर गुलालाने माखलं, अंतरवलीत महिलांकडून भव्यदिव्य स्वागत; गावात येताच दिला हा इशारा
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 08, 2025 | 1:31 PM

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईहून उपोषण करून आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेवटी ते या आरक्षणाच्या लढाईनंतर पहिल्यांदाच त्यांच्या अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. यावेळी जरांगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून जरांगे यांच्यावर क्रेनने गुलाला उधण्यात आला. लहान मुले, महिला देखील मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या. महिलांनी ओवाळून जरांगे यांचे गावात स्वागत केले. यावेळी लोक मोठ्या संख्येने जमले होते. मुंबईच्या आंदोलनात सरकारने जरांगे यांच्या मागण्यांचा थेट जीआर काढलाय. जरांगे यांनी थेट म्हटले की, संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये गेलाय.

गावात करण्यात आलेल्या स्वागतानंतर जरांगे पाटील हे भावूक झाले. मात्र, गुलालाच्या अंगाने त्यांनी सरकारला अत्यंत मोठा इशारा दिलाय. मनोज जरांगे म्हणाले की, आनंद एवढ्या झालाय की, मला बोलता पण येत नाहीये. समाज लढून दमला होता, पण दोन वर्षात आपण आरक्षण मिळवले. 25 लाख कुणबी सातारा गॅझेटमध्ये आहेत. आम्ही हे काबाड कष्टाने मिळवले. आम्ही गुलाल विकत आणतो, पन्नास पन्नास रुपये जमा करून जेसीबी लावल्या. काही मतभेद झाले असतील तर अंतरवाली सराटीवाल्यांनी विसरून जायचे.

जे जीआर चुकीचा आहे म्हणतात ते म्हणत होते मराठे कधी एकत्र येणार नाहीत. अंतरवाली सराटीच्या महिलांच्या खांद्याला खांदा लावून राज्याच्या महिला उभ्या राहिल्या. अंतरवाली सराटीने महाराष्ट्राला आदर्श दिला. विजयी मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्र अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. परंतू अजून काही बाबत ठरले नाही. जीआर निघाला म्हणजे मराठे आरक्षणात गेले, असल्याचे ठणकावून सांगताना मनोज जरांगे हे दिसले.

मनोज जरांगे यांनी म्हटले की, मागे पुढे झाले तर महाराष्ट्र बंद, एकही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी थेट हा मोठा इशाराच सरकारला दिला आहे. पुन्हा एकदा सरकारला इशारा देताना जरांगे हे दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून जरांगे हे आरक्षणाच्या मागणीवर अनेकदा उपोषण करताना दिसले आहेत. शेवटी मराठा आरक्षणाबद्दल सरकारला जीआर काढवाच लागला.