सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, सरकारचे टेन्शन वाढले, थेट या दिवशी आंदोलन..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मोठी घोषणा केली. ते पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत. मोठे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचे आहे. आजपासूनच कामाला लागायचे.

सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, सरकारचे टेन्शन वाढले, थेट या दिवशी आंदोलन..
Manoj Jarange Patil
| Updated on: Jul 29, 2026 | 12:44 PM

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावलीमध्ये मोठा एल्गार दिला. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. कधी काळी समाज एकवटला त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पुढं जायचं. 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला जर कोणी येड्यात काढत असेल त्यामुळे तुम्हाला बोलावलं. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची अंतरवालीतून घोषणा केली. त्यांनी थेट पुन्हा शेवटच्या आंदोलनाची घोषणा केली.सरकार 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देत नाही म्हणून एकदम मोठं निर्णायक आंदोलन करायचे आहे. ज्यांना माहित आहे की, आपल्या नोंदी सापडल्या त्यांनी तात्काळ अर्ज करा.

पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, समाजातील लेकरांच हाल होत आहे, गेल्या तीन वर्षांपासून रक्त जळतोय म्हणून समाजाच्या लेकरांसाठी शेवटचा निर्णायक आंदोलन करणार आहे. एकानेही घरी थांबायचं नाही, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सोडायचं नाही. हैद्राबाद गॅझेटीयर दिलं तर मग् प्रमाणपत्र का दिल नाही. मराठ्यांना टार्गेट कश्यामुळे करता, आधी तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल आणला.

आता तुकडा पडल्याशिवाय राहणार. हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. 29 ऑगस्टपासून जोपर्यंत आंदोलन चालणार आहे, तो पर्यंत वेळ द्या. सर्वापक्षीय नेत्यांच्या मुलांना आरक्षण लागणार आहे. 28 ऑगस्टपर्यंत हैद्राबाद गॅझेट नुसार प्रमाण पत्र द्या, जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टीमेटम.

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, 5 गॅझेट आम्ही तुम्हाला तीन वर्षांपासून घ्या म्हणतोय तुम्ही का घेत नाही? मराठा समाजाच्या लेकरांना का टार्गेट करताय. यांच्या श्रेय वादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी जातोय. 28 ऑगस्टच्या आत आम्हाला पाहिजे अन्यथा 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचे. आम्हालाचं मारून आमच्यावर केसेस? आता तुकडा पडल्याशिवाय थांबायचा नाही.

29 ऑगस्टला आपल्याला एकही मागणी माग ठेवायची नाही. सगळ्या केसेस मागे घेतल्याशिवाय हटायचं नाही. मी मागे काही दिवसापूर्वी बाजावार बसुन उपोषण केले. तेव्हा यांनी एक जीआर काढला की ओबीसीची सवलती लागू केल्यात. विखे पाटील मुख्यमंत्र्यांना सांगत आहेत की नाही ते सुद्धा माहित नाही. एकही योजना अजून लागू नाही. नेमकं सरकार मराठ्यांना मुर्खात काढतंय की कॉलेजवाले मुर्खात काढायला लागलेत तेच कळत नाही.

फक्त उपसमितीच्या बैठाका सुरु आहेत, ओबीसी सवलती लागू केल्या तर त्या संबंधित मंत्रालयाला सांगा. अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही स्थापन केलं. अनेक मुलांनी वाहन घेतले, सिव्हिल खराब झाले, त्याचे परतावा का दिला नाही. आमचा संयम तुटेल इतकं मुर्खात नका काढू. सारथीच्या योजना बंद करत आणल्या, कागदावर सुरु आहेत. आता मुलांसमोर सोक्ष मोक्ष होणार.

स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी केली, यांना स्थापन करायला काय अडचण आहे. मला कोण म्हणाल त्याच नाव मी 29 ऑगस्टला तुम्हाला सांगणार आहे. त्या 9 लोकांचे नाव सांगणार आहे. सरकार कुणाचाही असू द्या आपल्या मुलांना अधिकारी करा. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी केली, यांना स्थापन करायला काय अडचण आहे. मला कोण म्हणाल त्याच नाव मी 29 ऑगस्टला तुम्हाला सांगणार आहे.

त्या 9 लोकांचे नाव सांगणार आहे, सरकार कुणाचाही असू द्या आपल्या मुलांना अधिकारी करा, जरांगे पाटील म्हणाले की, सगळ्या पक्षाला मराठ्यांचा आदेश असला पाहिजे. 29 ऑगस्ट रोजी गावागावातले मराठे वाघासारखे तुडून पडणार आहेत. 9 मंत्र्यांनी सांगितलं की देऊ नका, मराठ्याना उपसमिती आहे म्हणून देऊ नका. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मग त्यांना स्वतंत्र मंत्रालय कशाला पाहिजे, त्याचे मंत्री अतुल सावे आहे ना.

मला तुमच्याकडून कामं नको पद नको जे काही द्यायचं ते मराठ्यांना द्यायचं आहे. यांनी ओबीसी आरक्षण दिलं. निवड झालेल्या मराठ्यांच्या पोरांना तुम्हाला का नियुक्त्या द्यायच्या नाही. फडणवीस यांनी मग असा दुजाभाव का केला? जरांगे यांचा संतप्त सवाल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us