
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर ओबीसीतून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. शेवटी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. राज्यभरात मराठा समाजामध्ये एक उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय. मराठा समाजाने मुंबईत उपोषण सुरू केल्यानंतर मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी ही बघायला मिळाली. आपल्या मागण्या मान्य झाल्याने उत्साहाचे वातावरण मराठा समाजात असून आमच्यासाठी दिवाळीच असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, दुसरीकडे सरकारने काढलेल्या जीआरनंतर ओबीसींमध्ये संतापाचे वातावरण हे बघायला मिळतंय. अनेकांनी थेट म्हटले की, आम्ही सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत. या आंदोलनाबद्दलचे सर्व अपडेट्स वेळोवेळी आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून देत राहणार आहोत, दिवसभर फॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे समोरासमोर चर्चेसाठी तयार नाहीत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष चीनमध्ये पुतिन यांना भेटल्यानंतर एर्दोगान यांनी हा दावा केला. चीनमध्ये पुतिन यांना भेटल्यानंतर त्यांनी हा दावा केला. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरही बोलले. एर्दोगान म्हणाले की, उच्चस्तरीय बैठकीसाठी परिस्थिती तयार नाही.
धुळ्यातील लालबाग मित्र मंडळाकडून सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण केले गेल. गणेशोत्सवानिमित्त पाचशे महिलांनी अथर्वशीर्ष पठणात सहभाग घेतला. बाजारपेठ परिसर मंत्रोच्चाराने दुमदुमून गेला. दरवर्षी लालबाग मारुती मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन होते.
राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानी गणपती बाप्पााच्या दर्शनसाठी गेले होते. यावेळी अमृता फडणवीस, शर्मिला ठाकरे या देखील यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे आणि फडणवीस यांची पाचवी भेट आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने याकडे पाहिलं जात आहे.
जीआरमधील काही शब्द आणि वाक्यांबाबत संभ्रम आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. सोमवार, मंगळवारपर्यंत कोर्टात जाण्याची तयारी आहे, असं भुजबळ यांनी पुढे सांगितलं. ओबीसींचं नुकसान होत असेल तर आम्ही कोर्टाची पायरी चढू. पण शांत राहा, असंही ते पुढे म्हणाले.
मराठा आरक्षण संदर्भात कालच महाराष्ट्र शासनाने एक जीआर जाहीर केला आहे. या शासन निर्णयामध्ये असलेली वाक्य आणि शब्द यामुळे संभ्रम आहे. यासंदर्भातले वेगवेगळे अर्थ ओबीसी आणि मागसवर्गीस संघटना आणि नेते यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं दिली आहे. काही ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. काही जण जीआर देखील फाडत आहेत.तज्ज्ञांची मत जाणून घेऊन आम्ही या संदर्भात माहिती घेत आहोत, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाचा जीआर काढल्याने ओबीसी नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्याच्या आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंनी शासनाने काढलेला जीआर फाडला. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
पालघरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये भंगार माफीयांनी उच्छाद मांडला आहे. बँकेने जप्त केलेल्या आणि बंद पडलेल्या कंपन्यांमधील भंगारावर माफीयांनी डल्ला मारून कोट्यावधी रुपयांचं भंगार लंपास केलं आहे. एमआयडीसीमधील एका कंपनीत भंगार चोर शिरल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी यावेळी भंगार चोराला फिल्मी स्ट्राईलने पकडलं.
मोठी बातमी समोर आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे वर्षा या शासकीय निवासस्थानी गणेशाचं दर्शन घेणार आहेत.
राज्य सरकारने 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेत प्रमुख मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य केल्या. त्यानंतर आंदोलक गावी परतले. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांकडून महायुती आरक्षण देण्यात यशस्वी ठरल्याचं सातत्याने म्हटलं जात आहे. आता भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणावरुन प्रतिक्रिया दिली आहे.
“या राज्यात शरद पवार आणि विलास देशमुख हे मुख्यमंत्री होते. पण त्यांनी आरक्षण दिलं नाही. माजी मुख्यमंत्री यांनी देखील आरक्षण दिल नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण दिलं आहे”, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंत यांच्याकडून तपोवन परिसरात पाहणी करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा, आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांनी एकत्रित पाहणी दौरा केला. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास काम तसेच सोयी सुविधा यांच्या अनुषंगाने प्रशासन अधिकारी व साधू महंत यांच्यात चर्चा झाली.
कर्नाटकातील बिदरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या कर्नाटकच्या परिवहन सेवेच्या बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 16 जखमी तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याच्या जीआरची ओबीसी समाजाने आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी केली आहे.
या जीआरमुळे काहीही फायदा होणार नाही, ही केवळ माहिती पुस्तिकाच आहे असा माझा जो दावा आहे त्यावर मी ठाम आहे असे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही सेवा उपदान मिळाले नसल्याने त्यांच्यात नाराजी असून प्रलंबित मागण्यासाठी त्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे.
सोलापुरात महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा मारहाणी दरम्यान मृत्यू झाला आहे. अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 2 तरुणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत वाढदिवस साजरा करण्यास सक्त मनाई आहे. मात्र साताऱ्यातील पाडेगाव ऊस संशोधन केंद्रामध्ये वाढदिवस साजरा करताना संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.राजेंद्र भिलारे आणि ऊस पैदासकर डॉ.कैलास भोईटे यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
सावंतवाडी येथील मोती तलावात मगरीला जेरबंद करण्यात सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश आले आहे. जलद कृती दलाच्या या सापळ्यात ही पाच फुटी मगर कैद झाली असून तब्बल पाच दिवस त्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले होते. मोहीम यशस्वी झाल्यानंतर सावंतवाडीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
परळी शहरात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात 18 ते 20 वर्षाचे युवक मोठ्या प्रमाणात नशा करत आहेत. यामध्ये व्हाइटनर, गांजा या पदार्थ्यांच्या नशेचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच परळी रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका युवकाने नशा करत पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला होता. आता परळी पोलिसांनी मोठी कारवाई करत 23 किलो गांजा आणि 12 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अहिल्यानगर शहरात ऐन गणेश उत्सव काळात माळीवाडा परिसरातील साठे वसाहत या ठिकाणी हातात तलवार आणि कोयते बाळगून दहशत माजवणाऱ्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन आरडाओरड करत रात्रीच्या वेळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या तरुणाविरुद्ध कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून 3 कोयते आणि 1 तलवार जप्त केली आहे.
विरार इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती नालासोपाऱ्यात टळली आहे. नालासोपारा पूर्व रहेमत नगर येथील आशिफा मंजिल अपार्टमेंट या 4 मजलीइमारतीच्या पिलरला तडे गेल्याने, त्या इमारती मधील 40 कुटुंबांना घराबाहेर काडून इमारत पूर्ण खाली केली आहे. या 40 कुटुंबातील 159 नागरिक होते. पिलरला तडे गेल्याने इमारत एका साईडला कलांडली गेली आहे. वसई विरार महापालिका प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळावर दाखल असून, आजूबाजूचा पूर्ण परिसरही सील केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “100 टक्के आरक्षण सरकार रद्द करणार आहे का?” असा सवालही त्यांनी विचारला आहे. तसेच त्यांनी असंही म्हटलं, “13 तारखेला न्यायालयात जाणार असून विखे पाटलांनादेखील न्यायालयात बोलवण्याची विनंती करणार आहे. राधा कृष्णविखे पाटील यांनी जरांगेंचा लाड करून घरी पाठवलं.”असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात कोर्टात सुनावणी झाली पण आता याबाबतची पुढील सुनावणी पुन्हा 4 आठवड्यानं होणार आहे. सर्व प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
मराठा आरक्षणावरून जरांगेंवर अॅड. जयश्री पाटील यांनी टीका केला आहे. “समाजाच्या जीवावर जरांगेंककडून घाणेरडे शब्द येत आहेत. जरांगेंच्या भूलथापांना बळी पडू नका” असंही जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.
धुळे – महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. धुळे महानगरपालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना नकाशे महापालिकेच्या इमारतीत लावण्यात आले . धुळे महापालिकेच्या 19 प्रभागाची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, 19 प्रभागात 74 सदस्य.. 17 प्रभागांमध्ये प्रत्येकी चार सदस्य. दोन प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन सदस्य आहेत.
मुंबईत जेवढे गुन्हे दाखल झाले, ज्यांच्यावर फाईन मारले ते गुन्हे माघारी घ्यावे असं सांगितलं आहे. कोणीही दंड भरू नका. कोणीही टेन्शन घेऊ नका – मनोज जरांगे पाटील
मराठा समाजातील लोकंच आपले दुश्मन आहेत. छगन भुजबळ बैठकीला गेले नाहीत म्हणजे हा जीआर पक्का आहे. महाराष्ट्रातील काही तज्ज्ञ मराठ्यांना बोलावले होते मात्र काहीजण वेळेत आले, पण काहीजण दुसऱ्या दिवशी 12 वाजता आले.
काल मुंबईत 150 अभ्यासक, हायकोर्टाचे 50 वकील होते. त्यांनी सांगितलं की जीआर ओके आहे. त्यामुळे घाबरु नका. पण काही अभ्यासकांना पोटात दुःखू लागले.
मराठे जिंकले पण तहात हारले असे यापूर्वी देखील म्हणत होते. शिंदे समितीने काढलेल्या जीआर नंतर 3 कोटी मराठे आरक्षणात गेले. त्यामुळे आता देखील मराठे युद्धात आणि तहात जिंकले आहेत. कोणी काहीही म्हणू देत – मनोज जरांगे पाटील
मला आणि तुम्हाला एकमेकांपासून तोडायचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोणीही यांच्यावर विश्वास ठेवू नका. जर गरीब मराठ्यांच्या कोणाच्या मनात काही शंका असेल तर ती काढून टाका असं जरांगे म्हणाले.
हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहेत.. मी आनंदी आहे, समाज आनंदी आहे. कोणी काही बोललं तरी आम्हाला काही फरक पडत नाही असं जरांगे म्हणाले.
गॅलेक्सी रुग्णालयातून मनोज जरांगे पत्रकार परिषद घेत आहेत. मराठ्यांनी जीवाची बाजी लावून लढाई जिंकली. सर्व सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात मराठा बांधवांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. जोरदार घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करत मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी सरकार तसेच मनोज जरांगे यांचे आभार मानले. सरकारने काढलेल्या अध्यादेशावर मराठा बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीत मराठा आरक्षणाच्या जीआरविषयी भुजबळ चर्चा करणार आहेत. मंत्रीमंडळ बैठकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्री-कॅबिनेट बैठक होणार आहे.
“कोण हरलं का, कोण जिंकलं का याचा विचार करतोय. जीआरबाबत ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्याही मनात शंका आहेत. आम्ही जीआरबाबत वकिलांचा सल्ला घेतोय,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.
जळगावात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील याने एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. या पोलिस निरीक्षकाची विभागीय चौकशी करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.
नांदेड- ऑगस्ट महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे नांदेड जिल्ह्यात 15 जणांचा मृत्यू झाला. दीड हजार घरांची पडझड झाली असून 5 लाख 8 हजार हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. तर 215 जनावरं दगावली आहेत आणि 15 हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
नाशिकमध्ये मराठा संघटनांकडून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. नाशिकची ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेची आरती करून हा जल्लोष साजरा होईल. जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर जल्लोष होणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने काल आझाद मैदान इथं जरांगे पाटलांना जीआर दिल्यानंतर जरांगे पाटील आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
परळी बंद. मूक मोर्चाला सुरुवात. मोठ्या संख्येने मूक मोर्चामध्ये महिला पुरुष सहभागी. दोन दिवसापूर्वीच रेल्वे स्टेशन परिसरात एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. आरोपीचं संपूर्ण प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला आहे.
“शेवट गोड झालेला आहे आणि स्वत आंदोलकांनी गुलाल उधळलेला आहे. तसा नवी मुंबईतही गुलाल उधळला होता. पण नवी मुंबईतील गुलाल आणि मुंबईत उधळलेला गुलाल यात काय तफावत आहे, याकडे अभ्यासक म्हणून मला पहायचं आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मराठी बांधव आले. त्यांच्या मागण्या होत्या आरक्षणासंदर्भात. पावसात, चिखलात मनोज जरांगे आणि त्यांची लोक आंदोलन करत होते. काल सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. या बाबत जरांगे समाधानी असतील, तर आम्ही समाधानी आहोत” असं संजय राऊत म्हणाले.
धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ५० रुपये प्रति किलोच्या आत असलेले बहुतांश भाजीपाल्याचे दर आता ६० रुपयांच्या पुढे गेले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेला मर्यादित साठा आणि वाढलेली मागणी यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. यामुळे सामान्य ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होत आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडले. उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून परतल्यानंतर रात्री उशिरा ते रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्यामुळे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समर्थकांना त्यांची भेट टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे, जेणेकरून उपचारांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
वर्ध्यात रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या एका आरोपीला लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखा नागपूर आणि वर्धा रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. आरोपीकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीचे एकूण १३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून या आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक असून, पोलिसांनी प्रवाशांना त्यांच्या वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी परळी रेल्वे स्थानक परिसरात पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आज संपूर्ण परळी शहर बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सकल परळीकरांच्या वतीने आज मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता राणी लक्ष्मीबाई टावर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकेल. पंढरपूर येथील एका कुटुंबासोबत कामासाठी आलेली ही मुलगी रेल्वे स्थानकात थांबली असताना आरोपीने तिला निर्जनस्थळी नेऊन हे कृत्य केले होते. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या मोर्चामध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्नातून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या केंद्रात सुमारे 1400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. काल सायंकाळच्या जेवणानंतर अनेक प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरू झाला. त्यानंतर, तातडीने 170 हून अधिक प्रशिक्षणार्थींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या बाधित प्रशिक्षणार्थींवर उपचार सुरू असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदीजीं त्यांच्या आई बद्दल बोलले गेले अतिशय चुकीचं वक्तत्व आहे. इतक्या खालच्या लेवलचं राजकारण आतापर्यंत कधी गेलेलं नव्हतं की या लेव्हलपर्यंत राष्ट्रीय पक्षाचा नेता या लेवल ला जाऊन कोणाच्या आईवर बोलेल अशी वेळ कधी आलेली नव्हती, असे रक्षा खडसे यांनी म्हटले.
विषबाधा झालेल्यांपैकी 17 लोकांवर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती. प्रशिक्षणार्थी पोलीसांना अन्नातून ही विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. सर्व बाधित प्रशिक्षणार्थींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेय
हा जीआर नाही ही केवळ माहिती पुस्तिका आहे;सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांना दिलेल्या जीआर वरून मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटलांच मोठ विधान. विखे साहेबांनी स्वतः पुढे यावं आणि आम्हाला समजावून सांगाव की या निर्णयाचा फायदा आम्हाला कसा होईल; विनोद पाटलांचा सवाल
मुंबईवरून जरागे पाटील छत्रपती संभाजी नगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. प्रकृती नाजूक असल्याने पुढील 15 दिवस आरामाचा डॉक्टरांकडून हा देण्यात आला.