
“माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. खूप प्रतिक्षा होती. अनेक शतकापासून शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलय. म्हणून सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या सगळया मराठ्यांना या काढलेल्या तिन्ही जीआरचं सर्व क्रेडिट समाजाला देतो. सगळं यश समाजाने मिळवलं. मी फक्त नाममात्र आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठवाडा. पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवावा. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणर. यात तिळमात्र शंका नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून गॅझेटियर लागू करण गरजेच होतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“जीआर निघणं खूप आवश्यक होतं. 1881 साली एक ओळ मराठ्यांच्या हिताची सरकारने लिहिली नव्हती. स्वातंत्र्य मिळून 75-76 वर्ष झाली. पण मराठ्यांच्या हक्काच गॅझेटियर असून मराठ्यांसाठी एक ओळ नव्हती” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “फक्त संयम, शांतता ठेवा. शांत डोक्याने विचार करा. एखादा विदूषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेऊन कधी आपण आपला संयम, विश्वास ढळू द्यायचा नाही” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
‘आता त्यांच्या हातातून सर्व गेलं’
“निर्णय घेताना आम्ही दोघे निर्णय घेतो. निर्णय घेताना एकट घेत नाही. मी आणि माझी सात कोटी गोरगरीब जनता. बाकीच्या काहींच पोट यासाठी दुखतय की, आता त्यांच्या हातातून सर्व गेलं. त्यांना ज्या आरक्षणावर राजकारण करायचं होतं, ते कोलमडलय. मग, आता काय करायचं?. हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत. ही आजची घटना नाही” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
‘खूप टोळ्या उठणार आहेत’
“ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी गॅझेटियर लावला आहे. मराठवाड्यात एकही मराठा आरक्षणाविना राहणार नाही. फक्त आनंदी राहा. कोणाचा ऐकून तुमचं, माझं भलं होणार नाही. खूप टोळ्या उठणार आहेत. आणखी सरकारच्या बाजूने बोलून नकारात्मकता पसरवायची आणि खुश करायचं” असं मनोज जरांगे पाटील बोलले.