Sambhaji Raje | मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे उदयनराजेंची पुण्यात भेट घेणार

खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) हे उद्या म्हणजे शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांची भेट घेणार आहेत.

खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) हे उद्या म्हणजे शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांची भेट घेणार आहेत. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मोर्चाची घोषणा केली आहे. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातून मराठा मोर्चाला (First Maratha Morcha) सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे उद्या उदयनराजेंना भेटणार आहेत. पुण्यात उद्या दुपारी 12 वाजता ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करुन सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची आणि उदयनराजेंची भेट झाली नव्हती. आता दोन्ही राजेंची भेट ठरली आहे. उद्या पुण्यात भेटून दोन्ही राजे मराठा आरक्षणाच्या पुढील लढाईची दिशा ठरवणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI