आढळराव पाटलांसाठी सुबोध भावे मैदानात, अमोल कोल्हेंविरुद्ध प्रचार

पुणे : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धडाका सुरु आहे. शिरुर मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अभिनेता सुबोध भावे मंचरमध्ये सभा घेणार आहे. आढळराव पाटलांविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीकडून अभिनेता अमोल कोल्हे मैदानात आहेत. सुबोध भावे काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे …

आढळराव पाटलांसाठी सुबोध भावे मैदानात, अमोल कोल्हेंविरुद्ध प्रचार

पुणे : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धडाका सुरु आहे. शिरुर मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अभिनेता सुबोध भावे मंचरमध्ये सभा घेणार आहे. आढळराव पाटलांविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीकडून अभिनेता अमोल कोल्हे मैदानात आहेत.

सुबोध भावे काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे चर्चेत आला होता. राहुल गांधी यांनी पुण्यातील भारती विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सुबोध भावे आणि आरजे मलिष्का या दोघांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. मात्र, या कार्यक्रमामुळे सुबोध भावेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. विशेषत: शिवसैनिकांनी सुबोध भावेविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. याचं कारण म्हणजे, सुबोध भावे हा शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष आहे.

गेले 15 वर्षे खासदार असलेल्या आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हेंचं आव्हान आहे. अनेक दिगग्ज नेत्यांच्या सभा या मतदारसंघात झाल्या. शिवसेना-भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विजय शिवतारे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली. तर राष्ट्रवादीकडूनही स्टार प्रचारकांनी इथे प्रचार केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले, धनंजय मुंडे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील अशा अनेक दिग्जज स्टार प्रचारकांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार केला. आता उद्या शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेकडून सुबोध भावे यांची मंचर येथे, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची खेड तालुका येथे सांगता सभा होणार आहे.

महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात शिरुर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *