AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! या महिन्यात मराठी माणूस पंतप्रधान होणार? माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या महिन्यामध्ये मराठी माणूस पंतप्रधान हेऊ शकतो असं वक्तव्य राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी केलं आहे, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! या महिन्यात मराठी माणूस पंतप्रधान होणार? माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 01, 2025 | 4:07 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  या महिन्यात मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाने गोंधळ घातला याचा मी जाहीर निषेध करतो, निवडणूक आयोगाच्या सावळ्या गोंधळाला सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. अमेरिकेत मोठा उद्योगपती. जेफ्री अ‍ॅमस्टिन त्याचं नाव आहे. त्या माणसाबद्दलचा हा विषय आहे. त्याने कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुंतवायचं आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. सर्व मोठ्या राजकीय नेत्यांची नावे अमेरिकेत आली आहेत. त्यात राष्ट्रपती ट्रम्प यांचं देखील नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. तिकडे निवडणूक आयोगाचे फार कडक निकष आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणं हा त्यांचा विषय आहे.

अमेरिकेची संसद त्यांच्या मागे लागली आहे. नावं खुलं करण्यास सांगत आहे. पण ट्रम्प करत नाहीत. कारण अनेक लोक अडचणीत येणार आहेत. संसद ट्रम्प यांच्या पाठिमागे सहा महिन्यापासून लागली आहे.  १० हजार कागदपत्रं संसदेने ताब्यात घेतले आहेत. संसद ही कागदपत्रं उघड करू शकते. सुब्रमण्यम स्वामी यांनी हा व्हिडीओ केला आहे. ते म्हणतात मला कागदं मिळतील. कागद मिळाल्यावर सुब्रमण्यम स्वामी बोलतील. आज त्यावर संसदेत गदारोळ होऊ शकतो. मी फक्त म्हटलं मराठी माणूस पंतप्रधान होणार आहे, त्यातून काय अर्थ काढायचा तो काढा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान