AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Sarnaik Car Accident : आमदाराच्या कारची युवकाला धडक, तरुण थेट कोमात!

अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या एका मुलाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Kiran Sarnaik Car Accident : आमदाराच्या कारची युवकाला धडक, तरुण थेट कोमात!
Kiran Sarnaik Car Accident
| Updated on: Sep 18, 2025 | 6:44 PM
Share

Kiran Sarnaik Car Accident : अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक , वाशीम यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या कृष्णा नंदू लष्कर (वय 25, वर्ष राहणार गौरक्षण वाडी चिखली, या तरुणास चिखली शहरातील पानगोळे हॉस्पिटलसमोर धडक दिली. या भीषण अपघातात कृष्णा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी कार घेतली ताब्यात

आमदार सरनाईक हे बुलढाण्यातील डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी जात होते. घटनेनंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी युवकास गाडीत टाकून जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल केले. याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही. मात्र आमदार सरनाईक यांची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

इनोव्हा गाडीचेही नुकसान

या अपघातात इनोव्हा गाडीचेही नुकसान झाले आहे. दुसरीकडे हा अपघात होताच आमदारांनी आपली गाडी थांबवून लगेच तरुणाला रुग्णालयात नेले. सध्या त्याची प्रकृती चिंताचनक आहे. तो सध्या कोमात आहे. त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. मात्र तरुण सध्या कोमात असल्याने नेमके काय होणार? याबाबत अनिश्चितता आहे.

अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही

दरम्यान या अपघातानंतर आमदारांची कार पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे पोलीस काही कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तरुणाच्या नेतवाईकांना या अपघाताबद्दल सांगण्यात आले आहे.

जुलै महिन्यात झाला होता असाच एक अपघात

याआधी जुलै महिन्यात अहिल्यानगर-पुणे महामार्गावर असाच एक अपघात झाला होता. या अपघातात भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारचा आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नितीन शेळके असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव होते. मृत तरुण नितीन शेळके हा हिरो कंपनीच्या मोटारसायकलने जातेगाव फाटा येथे नगर-पुणे रोड ओलांडत होता. त्यावेळी हा अपघात झाला होता.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता