राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगाने घडामोडी, रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा थेट कोअर कमिटीचे बैठक, सुनेत्रा पवार यांनी..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज आहे. कालच सुनेत्रा पवार यांनी आमदारांसोबत बैठक घेतली. त्यांनी आमदारांच्या अडचणी नक्की काय आहेत, ते जाणून घेतले. त्यानंतर पुन्हा आता बैठक घेतली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज महत्त्वपूर्ण बैठक आहे. कालच महत्वाची बैठक झाली. सुनेत्रा पवार यांनी आपल्या आमदारांसोबत संवाद साधला. यादरम्यान आमदारांनी थेट तक्रारीचा पाढाच वाचला. कशाप्रकारे भाजपाची दादागिरी सुरू आहे आणि काम करू दिले जात नसल्याचे अनेकांनी म्हटले. सातारा निवडणुकीत काय घडले, हे देखील सुनेत्रा पवार यांना सांगण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज सकाळी 9 वाजता बैठक आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. पक्षातील युवा नेतृत्व आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद आहेत. यासोबतच महायुती असूनही राष्ट्रवादीला डावलले जात असल्याचाही आरोप आहे. युवा नेते आणि ज्येष्ठ नेत्यांमधील खटके उडाल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती मिळतंय.
पक्षांतर्गत नाराजी आणि मतभेदांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षातील समन्वय आणि पुढील राजकीय रणनीतीबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. यादरम्यानच घडामोडींना वेग येत आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून बैठकींवर बैठकी घेतल्या जात आहेत. अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. काही नेत्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली.
निधी मिळाला नाही तर जेवढ्या मताने निवडून आलो तेवढ्याच मताने पडण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशिक मधील आमदारानी या बैठकीत भावना व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातील मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडून भाजपची दादागिरी नेमकी कशी वाढली आहे, याबाबत सांगण्यात आलं. नुकताच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कशा प्रकारे त्रास दिला याबाबत सांगितलं त्यामुळे नंतरच्या काळात जिल्हा बँक निवडणूक कशा प्रकारे शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढली याबाबत माहिती दिली.
नाशिक जिल्ह्यातील महिला आमदार सरोज अहिरे यांच्याकडून जिल्ह्यात काम करत असताना तसेच नुकताच सुरू झालेल्या कुंभमेळाच्या कामात कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपकडून डावलण्यात आलं आहे. याबाबत तक्रार या बैठकीत करण्यात आली.पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बैठक सुरू होण्यापूर्वीच कोणत्याही प्रकारे बैठकीत राजकारण नको अशा स्पष्ट सूचना आमदारांना दिल्यामुळे बैठकीत गोंधळ न होत आमदारानी आपल्या तक्रारी मांडल्या.