सावधान, मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर सेवेवर परिणाम

मध्य रेल्वेने रविवारी दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी घराबाहेर पडताना लोकलचे वेळापत्रक पाहून निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सावधान, मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर सेवेवर परिणाम
sunday mega block
| Updated on: Nov 13, 2026 | 7:06 PM

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.रविवारी मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. रविवारी सकाळी घरातून बाहेर पडताना लोकलचे वेळापत्रक पाहूनच निर्णय घ्यावा असे आवाहन त्यामुळे करण्यात येत आहे.

रविवारी या मार्गावर मेगाब्लॉक :

Loading...

मेन लाईन

ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ धिम्या मार्गांवर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

मुलुंड येथून सुटणाऱ्या ‘डाऊन’ धिम्या-अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे लोकल सकाळी १०.४३ वा. ते दुपारी ३.५३ वा. या वेळेत मुलंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कल्याण येथून सुटणाऱ्या ‘अप’ धिम्या-अर्ध-जलद उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी १०.३६ वा. ते दुपारी ३.५१ वा. या वेळेत कल्याण आणि मुलंड स्थानकांदरम्यान  ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल गाड्या डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. त्यानंतर, मुलंड स्थानकावर पुन्हा ‘अप’ धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाणे उपनगरीय रेल्वे सेवा नियोजित ‘डाऊन’ धिम्या मार्गावरूनच चालतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या सर्व ‘अप’ आणि ‘डाऊन’ धिम्या उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी ११.०० वा. ते सायंकाळी ५.०० वा. या वेळेत १० मिनिटे उशिराने चालतील.

हार्बर लाईन

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळता) ‘अप’ आणि ‘डाऊन’ हार्बर मार्गांवर सकाळी ११.०५ वा. ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

हार्बर मार्गाच्या लोकल रद्द

पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने जाणाऱ्या ‘अप’ हार्बर उपनगरीय रेल्वे फेऱ्या सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेलापूर-पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ‘डाऊन’ हार्बर उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत रद्द राहतील.

ट्रान्स-हार्बर लाईन विभाग

पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ‘अप’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील फेऱ्या, ज्या सकाळी ११.०२ वा. ते दुपारी ३.५३  वा.या वेळेत आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ‘डाऊन’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील फेऱ्या सकाळी १०.०१ ते दुपारी १५.२० या वेळेत रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – वाशी विभागात विशेष उपनगरीय रेल्वे सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us