मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. एनडीएमध्ये येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा अशा सूचना भाजपने दोन्ही राष्ट्रवादीला केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी आधी एक यावं आणि नंतर मग एनडीएमध्ये या असं भाजपने म्हटल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यास दोन्ही राष्ट्रवादींना केंद्रात एक -एक मंत्रिपद देखील मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती, मात्र त्यामध्ये खंड पडला आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. 14 जुलै रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आलं.
मात्र आता अशी बातमी सूत्रांकडून समोर येत आहे ती म्हणजे आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा आणि नंतरच एनडीएमध्ये या अशा सूचना भाजपाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला केल्या आहेत. तसेच दोन्ही राष्ट्रवादीचं जर विलिनीकरण झालं तर दोन्ही राष्ट्रवादीला केंद्रामध्ये एक -एक मंत्रिपद देखील मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता विलिनीकरणासंदर्भात नेमका काय निर्णय होणार ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर देखील चर्चेला उधाण आलं होतं. यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता जर एनडीएमध्ये यायचं असेल तर आधी दोन्ही पक्षांनी एकत्र या अशा सूचना भाजपने केल्याची माहिती समोर येत आहे.