AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Bonus: यंदा म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस, दिवाळी होणार गोड, सरकारचा मोठा निर्णय!

भारतातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यंदाच्या दिवाळीपूर्वी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस दिला जाणार आहे.

Diwali Bonus: यंदा म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस, दिवाळी होणार गोड, सरकारचा मोठा निर्णय!
Mhada
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 23, 2025 | 5:53 PM
Share

भारतातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. थोड्याच दिवसांमध्ये दिवाळीच्या तयारीलाही सुरुवात होणार आहे. यंदाच्या दिवाळीपूर्वी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) कर्मचाऱ्यांना यंदा 25 हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

30 हजार रुपये बोनसची होती मागणी

समोर आलेल्या माहितीनुसार, म्हाडा कर्मचाऱ्यांना 2024 मध्ये 23 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात आला होता. यावर्षी दिवाळी बोनस वाढवावा, अशी मागणी म्हाडा कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची होती. यंदा 30 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी म्हाडा कर्मचारी अधिकाऱ्यांकडून म्हाडा प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. यासंबंधीचे पत्रही म्हाडा प्राधिकरणास देण्यात आले होते.

25 हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार

दिवाळी बोनसचा प्रस्ताव गुरुवारच्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. यावेळी या प्रस्तावावर चर्चा झाली आणि शेवटी 25 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बोनसच्या रकमेत मागच्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार रुपयांनी वाढ करण्यात आल्याने कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळणार

मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही यंदा दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. यंदा बोनसची रक्कम गेल्या वर्षीच्या तुलने 500 ते 1 हजार रुपयाने वाढवली जाण्याची शक्यता आहे. मात्र कामगार संघटनेने तब्बल 20 टक्के म्हणजेच 66 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे, परंतू ही मागणी मान्य होणे शक्य नाही. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा बोनसची रक्कम वाढवली जाणार असल्याचे समोर येत आहे. गेल्या वर्षी दिवाळीला महापालिका कर्मचार्‍यांना 29 हजार रुपये बोनस मिळाला होता. यंदा यात 500 ते 1 हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा