AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरीश महाजनांनी तरी याकडे लक्ष द्यावे.. मंत्री छगन भुजबळांचा संताप, थेट म्हटले, मी मुख्यमंत्र्यांकडे..

नाशिकमधील खड्ड्याचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. लोकांचे या खड्ड्यांमुळे जीव जात आहेत. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले. त्यांनी थेट गिरीश महाजन यांचे नाव घेत मोठे विधान केले.

गिरीश महाजनांनी तरी याकडे लक्ष द्यावे.. मंत्री छगन भुजबळांचा संताप, थेट म्हटले, मी मुख्यमंत्र्यांकडे..
Girish Mahajan and Chhagan Bhujbal
| Updated on: Jul 31, 2026 | 12:34 PM
Share

नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी मंत्री गिरीश महाजन /यांचेही नाव घेतले. छगन भुजबळ यांनी नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवर संताप व्यक्त केला. छगन भुजबळ म्हणाले की, हे आमच्या मुळावर येत आहे. याकडे कोणी काही लक्षच देत नाहीये. नाशिकला येवढे खड्डे आणि नाशिक एवढे बेकार कधीच नव्हते. त्यादिवशी मी एका लग्नाला गेलो होतो, प्रचंड खड्डे. यामुळे वाहतूक धिम्म्या गतीने होते, वाहतूककोंडी. पोलिस तरी काय करतील? नगरसेवक स्वत: वैतागलेले आहेत. महापाैर काही करू शकत नाहीत. मग हे शहर काही वाऱ्यावर सोडले आहे का. नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यात छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेताना दिसले. त्यांनी म्हटले की, माझे या सगळ्या लोकांना सांगणे आहे की, ताबडतोब कारवाई करा, अथवा मी या सर्व गोष्टी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्‍यांच्या समोर मांडणार.

पण याला जबाबदार असणारे जे लोक आहेत, त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिले पाहिजे. जरा पाऊस ओरसला की, ते खड्डे भरले पाहिजेत. ठीक आहे… परत होईल खड्डा होऊ द्या, परत भरा. माणसं मरण्यापेक्षा डबल काम झाले तरीही काही हरकत नाही. एका मृत्यूसाठी त्यांनी 10 लाख रूपये दिल्याचे कळले. कुंभमेळा नाशकात होतोय, मंत्री महाजनांनी तरी लक्ष द्यावं.

माझं म्हणणं आहे की, जेवढे लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ते शासनाच्या महापालिका यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. एकाला जसा न्याय दिला तशीच रक्कम सर्वांना दिली पाहिजे. मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही. नाशिकचे नाव खराब करण्याचे काम सुरू आहे. नाशिकच्या रस्त्यांवर फिरा, तिथे काय आहे हे लक्षात येईल.

अधिकारी फक्त काय ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाहीत. कुंभमेळा असो किंवा काही पण शेवटी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी हे महापालिकेवरच आहे. रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची तर ही महापालिकेचीच जबाबदारी आहे. माझं काम नाही, त्याचं काम आहे असे म्हणून चालणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा