उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी दिले थेट उत्तर, म्हणाले, आम्ही अजिबात..

उद्धव ठाकरे यांनी साधू ग्रामसाठी आरक्षित जागेवरील वृक्ष तोडीच्या विषयावर सरकारवर जोरदार टीका केली. आता त्याला उत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी दिले असून त्यांची योजना नेमकी काय आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी दिले थेट उत्तर, म्हणाले, आम्ही अजिबात..
Minister Girish Mahajan
Updated on: Nov 29, 2025 | 9:22 AM

मंत्री गिरीश महाजन हे मालेगाव दाैऱ्यावर असून त्यांनी अनेक विषयांवर थेट भाष्य केले. गिरीश महाजन म्हणाले की, गेली अनेक दिवसांपासून हा विषय सुरू होता. बंडू काका बच्छाव यांचा प्रवेश भाजपमध्ये करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती आणि बंडू काकांची इच्छा होती. भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा. आज तो शुभ दिवस असे मी म्हणेल. मोठ्या उत्साहात जल्लोषात हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत प्रवेश झाला. बच्छाव यांच्या पक्ष प्रवेशाने पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे. त्यांचे चाहते त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा निश्चितच भाजप पक्षाला फायदा होईल…

अद्वय हिरे यांच्या अनुपस्थितीवर बोलताना गिरीश महाराज यांनी म्हटले की, त्या विषयी मला काही माहिती नाही. मी घाई गर्दीत प्रचारसभा आटोपून येथे आलो. याविषयी मला काही माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो. ते सुद्धा आता सक्रिय सदस्य झालेले आहेत. साधुग्राम वृक्षतोडीच्या विषयावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, उद्धवजी एकीकडे म्हणतात माझा कुंभ मेळ्याला विरोध नाही. एकीकडे म्हणतात झाडे तोडू देणार नाही. तोडायचे नाही. आम्ही सुद्धा वृक्षप्रेमी आहोत. सरकारची भूमिका देवेंद्रजींची भूमिका मोदीजींची भूमिका याबाबत स्पष्ट आहे.

आम्ही किती वृक्ष या ठिकाणी लावत असतो पावसाळ्यात. वृक्ष तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही. जी जागा आहे तर पुण्यातील ती साधू ग्रामसाठी आरक्षित आहे. ती शेकडो वर्षापासून. त्या ठिकाणी उगलेली झाडे मागच्यावेळी ही काढलेली होती. मोठी झाडे जी आहेत आम्ही त्या कोणालाही हात लावत नाही. जी झाडे या पाच सात वर्षात उगलेली आहेत. रोपटी आहेत त्यांनाच आम्ही हात लावणार आहोत आणि जे सात आठ वर्षातली प्लांटेशन आहेत ते आम्ही दुसरीकडे काढून लावणार आहोत.

त्यासाठी चार-पाच जागा आम्ही शोधलेल्या आहेत. आम्ही काल पासून पंधरा हजार खड्डे करायला सुरुवात केली आहेत. मी स्वतः हैदराबादला जाऊन आठ फुटी दहा फुटी झाडे आणून त्या ठिकाणी लावणा. दोन वर्षात त्याठिकाणी कशाबद्दल होणार आहे तुम्ही बघा. 100 टक्के झाडे आम्ही जगवणार आहोत. साधूग्रामला ती जागा आवश्यक आहे शेकडो वर्षापासून साधू राहत असल्याची ती परंपरा आहे. थोडी आमची ही भूमिका समजून घ्या.

कुंभमेळा हा आपला सर्वात मोठा धार्मिक उत्सव सोहळा आहे. वृक्षतोड होईल त्यामुळे आम्ही वृक्षतोड्याचे मागे लागलो आहोत असे समजायचे काही कारण नाही. 100 टक्के सांगतो, एका झाडाला दहा नाही तर पंधरा झाडे लावतो. हजार झाडे तोडल्यावर आम्ही पंधरा हजार झाडे लावणार आहोत. ती झाडू काढू तीसुद्धा आम्ही प्लांटेशन करणार आहोत. जो खर्च येईल ती महापालिका या ठिकाणी करेल..

साधुग्राम जागेवर रेस्टॉरंट, बँकवेट हॉल उभारणीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, आम्ही त्या जागेवर कुठेही काही करणार नाही. तिथे काही उभारणार नाही.. आम्ही शेतकऱ्यांची जी जागा घेणार आहोत. त्या जागेवर सुद्धा अनेक वर्षापासून रिझर्वेशन पडलेले आहे. त्याचा मोबदला आम्ही त्यांना देणार आहोत. एकही झाड तोडून आम्ही त्या जागेवर रेस्टॉरंट बँक्वेट हॉल उभारणार नाही. मोकळ्या जागेवरच ते होईल. एकही झाड तोडून आम्ही रेस्टॉरंट किंवा बँकवेट हॉल उभारणार नाही. ज्या ठिकाणी झाडे आहेत वृक्ष आहेत त्या ठिकाणी आम्ही करणार नाही…