जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी, अहवाल काय?

| Updated on: Feb 03, 2021 | 11:24 PM

जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी केली. (Jayant Patil sugar factory weight scales inspection)

जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी, अहवाल काय?
Follow us on

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान सर्व वजन काटे अचूक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. (Jayant Patil sugar factory weight scales inspection)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा सांगलीतील राजारामबापू सहकारी साखर कारखाना फार प्रसिद्ध आहे. या कारखान्यातील वजनकाट्यांची अचानक तपासणी करण्यात आली. वैध मापन विभागाच्या भरारी पथकाने ही तपासणी केली केली.

सांगली जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी हे पथक तयार केले आहे. यावेळी भरारी पथकाने सर्व वजन काटे हे अचूक असल्याचा लेखी अहवाल कारखाना व्यवस्थापनाला दिला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वैध मापन विभागाच्या भरारी पथकाकडून वजनकाट्यांची अचानक तपासणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे आणि वाटेगाव- सुरुल शाखेच्या ठिकाणी अचानक येऊन वजन काट्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी भरारी पथकाने सर्व वजन काटे अचूक असल्याचा लेखी अहवाल कारखाना व्यवस्थापनाला दिला आहे.

साखर निर्मितीबरोबरच इथेनॉल निर्मिती

दरम्यान राजारामबापू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ जयंत पाटील यांनी केला होता. यावेळी जयंत पाटील यांनी साखर निर्मितीबरोबरच इथेनॉल निर्मिती करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे इथेनॉल निर्मिती सुरू करीत आहोत. हा पथदर्शी प्रकल्प 50 दिवसांत पूर्ण केले आहे. यात प्रतिदिन 78 हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे.

सध्या साखर उद्योग एका संक्रमण काळातून जात आहे. एका बाजूला एफआरपी देत असताना त्या प्रमाणात साखर विक्रीला दर मिळत नाही. हा मोठा प्रश्न साखर उद्योगापुढे निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी साखर निर्यात केल्यास त्याचे अनुदान वेळेवर मिळत नाही. त्यामुळे सध्या इथेनॉल निर्मिती हा एक चांगला पर्याय पुढे आला आहे, असे जयंत पाटील म्हणाले होते.  (Jayant Patil sugar factory weight scales inspection)

संबंधित बातम्या : 

…तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल : जयंत पाटील

मोठी बातमी: नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट; प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचाली अंतिम टप्प्यात

मुंबई लोकलच्या दारावर युवकाने डोकं टेकवलं! आनंद महिंद्राही भावूक