
मोठी बातमी समोर येत आहे, कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला, त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते काही मोठी घोषणा करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाट यांचा हा व्हिडीओ ट्विट केला होता, या व्हिडीओमुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केली असून, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे.
दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर याचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आलं, यावेळी कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले, तसेच कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली, दरम्यान याचवेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याच्या प्रकार देखील घडला आहे. त्यामुळे आता छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.
उद्या सकाळी माणिकराव कोकाटे हे पत्रकार परिषद घेणार आहेत, राज्यात सध्या सुरू असलेल्या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये माणिकराव कोकाटे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
तटकरेंचं सूचक विधान
दरम्यान रमीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर तुमचं मत काय असा सवाल यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना त्यांनी कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे आता कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष हे उद्याच्या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे.