
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान राज्यात सध्या सुरू आहे. कालपर्यंत प्रचार शिगेला पोहोचला होता. प्रत्येक राजकीय पक्षाने या निवडणुकीसाठी ताकद लावली. 5.30 पर्यंत मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. पंकजा मुंडे देखील बीड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. नुकताच पंकजा मुंडे यांनी मोठे भाष्य केले. पंकजा मुंडे यांनी म्हटले की, 12 दिवस नाही तर गेल्या दोन महिन्यापासून मी प्लॅनिंग केले. मुंबईला बैठका घेतल्या.. नगरपरिषदेची सर्व प्लॅनिंग यादी मी तयार केली. मुंबईत एक कॅबिनेट बैठक वगळता मी परळीत मुक्काम ठोकून आहे. जनता आम्हाला साथ देईल आणि आमचा मोठ्याने विजय होईल.
पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, शांततेत मतदान सुरू आहे, चांगलीच गोष्ट आहे. ते शांततेच व्हायला पाहिजे जनतेला त्यांचा कोल देण्याचा अधिकार आहे. डिस्टर्ब करण्याचा कोणी प्रयत्न केलातर पोलीस योग्य ती प्रशासनाने कारवाई करावी. बहिण भावाच्या विधानावर बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, तुम्ही आम्हाला बहिण भाऊ म्हणणं बंद करा. आम्ही बहीण भाऊ आहोतच.
आम्ही सिरीयस लीडर आहोत.. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत.. मी भाजपचे नेता आहे.. अशी आमची युती झाली आहे राज्यात ठीक ठिकाणी अशी आमची युती आहे. आम्ही बहिण भाऊ जरी असलो तरी आम्ही केवळ बहिण भाऊ नाही तर राजकीय जीवनात 20-22 वर्ष पूर्णपणे झोकून दिलेले नेते आहोत आपापल्या पक्षाचे. त्यासाठी आम्ही एकत्र या ठिकाणी पॅनल केला आहे.
खूनाच्या कटाबद्दल बोलताना पंकजा यांनी म्हटले की, मी तुम्हाला सांगते राज्यात कोणीही काही बोललं त्यावर मी कधी टीका टिपणी करत नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडून द्या. याबद्दल काय माहिती आहे असा प्रश्न विचारला तर अशा कुठल्याही विभद्र गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही. कारण आम्ही खूप रोटेटर जीवन जगलो. वडिलांनी आमच्या कानावर येऊ दिल्या नाहीत आणि तसा धाक मी निर्माण केला आहे.
आमच्याकडे कोणीही चाढ्या करत नाही महिला विषयी वाईट बोलण नाही. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे मला ते कधी आवडत नाही. त्यामुळे माझ्याकडे मुळात असं बोलत नाही. तो प्रकार माझ्याशी संबंधित नसल्याने त्याचे उत्तर मी का द्यावा. काय घटना घडली कुठली घटना घडली याचे उत्तर धनंजय मुंडे किंवा रत्नाकर गुट्टे देऊ शकतात. पैसे सापडल्याचे प्रकार मी माध्यमावर बघते यावर निवडणूक आयोग कारवाई करेल.