अब्दुल सत्तार यांचा मूळ स्वभाव कसा ? विखे पाटील म्हणाले ते माझे स्नेही पण…

राधाकृष्ण विखे पाटील हे पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी माध्यमांशी बोलत असतांना अब्दुल सत्तार यांच्याबद्दल देखील विखे पाटील यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

अब्दुल सत्तार यांचा मूळ स्वभाव कसा ? विखे पाटील म्हणाले ते माझे स्नेही पण...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 9:15 PM

पुणे : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्यातील बहुतांश नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. जवळपास सर्वच पक्षांनी नाराजी व्यक्त करत सत्तार यांच्या विधानाचे समर्थन केलेले नाहीत. मात्र, जूने सहकारी आणि कौटुंबिक संबंध ज्यांचे आहे ते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देतांना सत्तार यांचा स्वभाव कसा आहे हे सांगून टाकले आहे. त्यांचे विधान समर्थन करणारे नसल्याचं देखील विखे पाटील यांनी सांगितले आहे. खरंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि अब्दुल सत्तार हे कॉँग्रेसमध्ये सोबत होते, राधाकृष्ण विखे पाटील यांचे अब्दुल सत्तार हे कार्यकर्ते होते. त्यामुळे विखे पाटील आणि सत्तार यांची जवळीक सर्वश्रुत आहे. याआधी देखील सत्तार यांनी केलेल्या विधानावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्तार यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. कॉँग्रेसमधून विखे पाटील हे भाजपमध्ये गेले होते तर सत्तार हे शिवसेनेत गेले होते, त्यानंतर सत्तार हे शिंदे गटात गेले असून राज्याचे कृषीमंत्री झाले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील हे पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी माध्यमांशी बोलत असतांना अब्दुल सत्तार यांच्याबद्दल देखील विखे पाटील यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

सत्तार हे माझे जवळचे मित्र आहे त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहे, त्यांना मागेही सांगितलं होतं पण ते जाणीवपूर्वक करतात असे नाही. मुद्दाम करतात असे नाही त्यांचा तो मूळ स्वभाव आहे,

हे सुद्धा वाचा

यापूर्वी सल्ला दिला होता आत्ताही सांगेन कि आपण आता राज्यकर्ते आहोत, जपून बोललं पाहिजे, जो काही प्रकार घडला होता तो योग्य नव्हता असं सत्तार यांना सांगणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहे.

भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली असून ते योग्य नसल्याचे म्हंटले आहे, दरम्यान याबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देत असतांना सत्तार यांची जीभ घसरली होती, त्यांनी केलेल्या विधानावरून राज्यभर सत्तार यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.