रोहित पवारांचं थेट सरकारलाच चँलेज, म्हणाले, आजच नार्को टेस्ट करा पण…, अजित पवारांच्या अपघात प्रकरणात पुन्हा मोठा दावा..

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांच्याकडून गंभीर आरोप केली जात आहेत. त्यातच त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत थेट सरकारला आव्हानच दिले. याबाबत त्यांनी मोठी मागणीही केली.

रोहित पवारांचं थेट सरकारलाच चँलेज, म्हणाले, आजच नार्को टेस्ट करा पण..., अजित पवारांच्या अपघात प्रकरणात पुन्हा मोठा दावा..
Rohit Pawar
| Updated on: Nov 20, 2026 | 5:17 PM

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. हेच नाही तर मफलर मॅन नक्की कोण? याचाही खुलासा त्यांनी केला. VSR कंपनीला देवेंद्र फडणवीस वाचवत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. फडणवीसांवर थेट आरोप रोहित पवार यांनी केल्याने भाजपाचे नेते चांगलेच संतापले. भर पत्रकार परिषदेत फडणवीसांचा एक फोटोही रोहित पवार यांनी दाखवला. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले. हेच नाही तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणात हातवर केले. ही पक्षाची भूमिका नसून रोहित पवार यांची वैयक्तीक भूमिका असल्याचे विधान सुप्रिया सुळे यांनी केले. फडणवीसांवर आरोप केल्यानंतर आता पुन्हा एक पोस्ट सोशल मीडियावर रोहित पवार यांनी शेअर केली. यात थेट सरकारला आव्हानच रोहित पवार यांनी दिले.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, अजितदादांच्या अपघातात दोषी असलेल्या VSR कंपनीला क्लिनचिट देण्यासाठी सध्या भलतीच घाई सुरूय. ४० पैशांच्या ट्रोलर्स गँगपासून तर अनेक आमदार-मंत्र्यांपर्यंत सगळेच एकसुरात या कंपनीची पाठराखण करतायेत. एवढा आटापिटा एका कंपनीसाठी करण्यापेक्षा अजितदादांना न्याय मिळण्यासाठी केला असता तर महाराष्ट्राला नक्कीच अभिमान वाटला असता.

Loading...

पण दादांना न्याय देण्याऐवजी संपूर्ण सरकारी यंत्रणा एका कंपनीसाठी कामाला लागली असेल, तर VSR आणि ‘त्यांचे’ नेमके काय लागेबांधे आहेत आणि कसे घनिष्ठ संबंध आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. या कंपनीची वकिली करताना स्वाभिमानाचं विसर्जन केलेल्या एका अंधभक्त मंत्र्याने तर चक्क माझी ‘नार्को टेस्ट’ करण्याची मागणी केली.

पण माझं सरकारला थेट आव्हान आहे, बिलकूल वेळ दवडू नका, आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा! पण अट एकच… माझ्यासोबत ‘त्यांची’ देखील नार्को टेस्ट करा, म्हणजे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊन जाईल. मी कधीही तयार आहे… पण सत्य समोर येण्याच्या भीतीने ‘ते’ या अग्निपरिक्षेला तयार होतील का?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us