आधी महिलेची खोलीत एन्ट्री, नंतर सत्ताधारी नगरसेवक आला; कथित CCTV वरून भाजप-शिंदे गटात वाद

viral video : भाजप नगरसेवकाचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून भाजप-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.

आधी महिलेची खोलीत एन्ट्री, नंतर सत्ताधारी नगरसेवक आला; कथित CCTV वरून भाजप-शिंदे गटात वाद
| Updated on: Jul 30, 2026 | 8:25 AM

राज्यात भाजप आणि शिंदे गट जोडीने सत्ता सांभाळत आहेत. परंतु मीरा-भाईंदरमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. मिरा-भाईंदरमध्ये दोन्ही सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. एका कथित सीसीटीव्ही व्हिडिओवरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका खोलीत महिला शिरली. त्यानंतर काही वेळात भाजप नगरसेवक शिरल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु हा व्हिडिओ एडीट करून दिशाभूल करण्यात असल्याचा दावा भाजप नगरसेवकाने केला आहे.

मिरा-भाईंदरमधील कथित सीसीटीव्ही व्हायरल व्हिडिओवरून भाजप-शिंदे गटात राजकीय वाद सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिरा-भाईंदरमधील कथित भाजप नगरसेवक तरुण शर्मा यांचा कथित सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर एका महिलेने खोलीत प्रवेश केल्यानंतर काही वेळातच तरुण शर्मा तिथे गेल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. परंतु हा व्हिडिओ एटीट करून दिशाभूल करण्यात आली, हा घटनाक्रम खरा नाही, असा दावा तरुण शर्मा यांनी केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीसीटीव्हीची संबंधित महिलेने काशीगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी मूळ सीसीटीव्ही फुटेज चोरून त्यात फेरफार केल्याचा आरोप तरुण शर्मा यांनी केला आहे. एडीट करण्याता आलेला व्हिडिओ ⁠हे राजकीय प्रतिस्पर्धी अमित झा यांच्याकडे दिल्याचाही आरोप आहे. दोन्ही बाजूंकडून परस्पर आरोप-प्रत्याआरोप सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने मिरारोडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.

पोलिसांनी काय म्हटलं?

पोलिसांनी स्पष्ट केलं की, ‘दोन्ही शेजाऱ्यांमध्ये वाद सुरू होता. दोन्ही बाजूंनी घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबांना कॅमेरे हटविण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तक्रारारदार महिलेने कॅमेरे काढलेले नाहीत. तर दुसऱ्या कुटुंबाने सीसीटीव्ही कॅमेरे हटवलेले नाहीत. त्यानंतर महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us