फॉर्म भरण्याचा दिवस, बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या आमदाराची ऑफर

आष्टी, पाटोदा, शिरुर मतदार संघातील ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतील अशा गावांना आगामी काळात प्रत्येकी 21 लाखाचा विकास निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली आहे.

फॉर्म भरण्याचा दिवस, बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या आमदाराची ऑफर
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:11 PM

बीड :  राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी अनेक नेते-पुढारी मंडळी पुढे सरसावली आहेत. कोरोना संकटाच्या काळात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली तर लाखो रुपयांचं बक्षीस विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जाहीर करुन टाकलं आहे.  अशातच आष्टी, पाटोदा, शिरुर मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास 21 लाखांचा निधी देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली आहे. (MLA Balasaheb Ajabe offred Devp Fund for Village To make unopposed Gram panchayat Election)

आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघातील ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतील अशा गावांना आगामी काळात प्रत्येकी 21 लाखाचा विकास निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार आजबे यांनी दिली आहे.

बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. आष्टी, पाटोदा, शिरुर मतदारसंघात 23 ग्रामपंचायती्च्या निवडणुका होत आहेत. बिनविरोध निवडणूक घेणाऱ्या ग्रामपंचायतींना आगामी पाच वर्षांच्या काळासाठी प्रत्येकी 21 लाख रुपये विकास निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली आहे. यातील 10 लाखांचा निधी आमदार निधीतून तर 11 लाखांचा निधी कंपनी विकास निधीतून (सीएसआर फंड) देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्रामस्थांनीही आपापसातील मतभेद, भांडणतंटे, पक्षीय विचार बाजूला ठेऊन गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध कराव्यात असे आवाहनही आमदार आजबे यांनी केलं आहे.

आमदार आजबे यांच्या आवाहनाला मतदारसंघातील किती ग्रामपंचायतींचा प्रतिसाद मिळतो हे पुढील आठवडाभरात स्पष्ट होणार आहे . आजपासून नामनिर्देश भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. पहिल्या दिवशी किती अर्ज येतील हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

  • निवडणुका बिनविरोध करा, बक्षिस जाहिर करणारे आमदार
  • 1.निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस (पारनेर,अहमदनगर) आमदार निधीतून 25 लाखांचा विकास निधी देणार
  • 2. कैलाश पाटील, शिवसेना (कळंब-उस्मानाबाद) आमदार निधीतून 25 लाख रुपये देणार
  • 3.  रत्नाकर गुट्टे, रासप ( गंगाखेड,परभणी) स्वत:च्या आमदार निधीतून गावांच्या लोकसंख्येनुसार 11 ते 21 लाखांचा निधी देणार
  • 4. अभिमन्यू पवार, भाजप (औसा, लातूर) आमदार निधी आणि इतर निधीतून 21 लाखांचा निधी देणार
  • 5. चिमणराव पाटील, शिवसेना (पारोळा, जळगाव) आमदार निधीतून 21 लाख रुपये
  • 6. श्वेता महाले, भाजप (चिखली, बुलढाणा) आमदार निधीतून 21 लाख रुपये
  • 7. सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस (मावळ) आमदार निधीतून 11 लाख रुपये
  • 8. अभिजित पाटील पंढरपूरचे कारखानदार
  • स्वत:कडून प्रत्येकी 1 लाख रुपये देणार
  • 9. सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस, देवळाली)
  • आमदार निधीतून 25 लाख रुपये

(MLA Balasaheb Ajabe offred Devp Fund for Village To make unopposed Gram panchayat Election)

संबंधित बातम्या

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 21 लाखांचा निधी मिळवा, आ. लंकेंच्या पावलावर या आमदाराचं पाऊल!

बिनविरोध ग्रामपंचायत, राजकारणाचा नवा भूलभुलय्या?

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.