मंत्री गिरीश महाजन आणि विजय चाैधरी यांची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल, रोहित पवारांची जोरदार टीका, रक्षा खडसेंना..

मंत्री गिरीश महाजन आणि विजय चाैधरी यांची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. रक्षा खडसे यांच्याबाबत या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरली जात आहे. यावरून आता आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली.

मंत्री गिरीश महाजन आणि विजय चाैधरी यांची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल, रोहित पवारांची जोरदार टीका, रक्षा खडसेंना..
Girish Mahajan Raksha Khadse Vijay Chaudhary Rohit Pawar
| Updated on: Jul 30, 2026 | 11:10 AM

भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्याने मोठी खळबळ उडाली. थेट रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने यादरम्यान करण्यात आली. हेच नाही तर रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणीही विजय चाैधरी यांच्याकडून करण्यात आली. विजय चाैधरी वारंवार रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसत आहेत. मात्र, भाजपाचे नेते आणि मंत्री म्हणून त्यांनी एकदाही विजय चाैधरी यांना थांबवण्याचे काम गिरीश महाजन यांनी केले नाही. एकाच घरात राहतात आणि खडसे भाजपावर टीका करतो.. तुमच्यावर टीका करतो… असे म्हणताना विजय चाैधरी यांनी म्हटले. यावेळी ते अनेकदा वादग्रस्त बोलतानाही दिसत आहेत. या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली. पुन्हा एकदा भाजपातील अंतर्गद वाद चव्हाट्यावर आला.

क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचे दिसत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर आमदार रोहित पवार यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, भाजप हा कधीच महिलांचा सन्मान करणारा पक्ष नव्हता तर कायम पाताळयंत्री आणि कारस्थानी पक्ष राहिलाय

हेच भाजपचा पदाधिकारी विजय चौधरी यांच्या राजीनाम्याने स्पष्ट झालं… स्वतःच्याच पक्षाच्या महिला नेत्यांबाबत करत असलेलं कारस्थान उघडकीस आल्याने पक्षाच्या इज्जतीचा जो जाहीर पंचनामा झाला त्यावर पांघरुन टाकण्यासाठीचा हा राजीनामा झाला आहे. या राजीनाम्याने व्हायरल ऑडिओ क्लिपलाही दुजोरा मिळाला आहे. आता भाजपा कोणत्या तोंडाने महिला सन्मानाच्या गप्पा मारणार?

महत्त्वाचं म्हणजे केवळ एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा झाला, पण महिलेला शिवीगाळ करताना संबंधित मंत्र्याने या पदाधिकाऱ्याला कुठंही अडवलं नाही, त्या मंत्र्यांचं काय…???? भाजप उत्तर देणार आहे का? मुळात म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. गेल्या काही वर्षांपासून खडसे विरूद्ध महाजन असा संघर्ष बघायला मिळतोय. त्यातच ही धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us