Rohit Pawar : कागदावर आम्हाला 46 टक्के मतं होती पण EVM उघडताच थेट..रोहित पवारांचा प्रेझेंटेशनमधून मोठा दावा

Rohit Pawar : "आपल्या महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने SIR प्रक्रिया राबविण्यात आली आहे आणि प्रत्येकी पाच मधला एक मतदार या प्रक्रियेत वगळण्यात आला आहे" असा दावा रोहित पवार यांनी केला.

Rohit Pawar : कागदावर आम्हाला 46 टक्के मतं होती पण EVM उघडताच थेट..रोहित पवारांचा प्रेझेंटेशनमधून मोठा दावा
Rohit Pawar
| Updated on: Sep 27, 2026 | 12:08 PM

अक्षय मंकणी, प्रतिनिधी : निवडणूक आयोगात मतभेद असल्याचं समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. सर्वप्रथम इंडियन एक्सप्रेसने या संबंधीचं वृत्त दिलं. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दोन्ही निवडणूक आयुक्तांनी 10 महिन्यांत तब्बल 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले. निवडणूक आयोगाच्या या कारभारामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्या आधी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडले. पोस्टल मतांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. पण तेच ईव्हीएमद्वारे मतमोजणी सुरु झाल्यावर महायुतीचे उमेदवार पुढे गेले असा रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेचा सूर होता.

रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन देऊन पोस्टल मतमोजणी आणि ईव्हीएम मतमोजणीत मविला आणि महायुतीमध्ये किती फरक होता ते दाखवून दिलं. ईव्हीएम मॅनेज केल्याची जी चर्चा सुरु आहे ती खरी असू शकते असं वाटतं. ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात जो मोर्चा निघणार आहे, त्यात ईव्हीएम हटाओ हा सुद्धा एक मुद्दा घ्यावा असं रोहित पवार म्हणाले. ज्ञानेशकुमार राजा म्हणून बसल्यावर निवडणूक आयोग आपल्या बापाचा असल्यासारखं वागत आहेत. त्यामुळे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं रोहित पवार म्हणाले. राज्यात जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा वाढलेली मतदारांची संख्या ही कमी होती पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र पाच पटीने मतदारांची नावे वाढवण्यात आली असं रोहित पवार यांनी दावा केला.

शिंदे गट कमी होता पण..

“कागदावर शिंदे गट कमी होता. पण ईव्हीएम सुरु होताच थेट 70 टक्क्यांवर गेला. कागदावर आम्ही काँग्रेसवाले 55 टक्के होतो तेच ईव्हीएमवर डायरेक्ट 14 टक्क्यावर गेलो. कागदाचा मुद्दा आला की मागे पडलो. कागदावर आम्ही शरद पवार पक्ष 46 टक्क्यावर होतो. पण ईव्हीएम उघडताच थेट 11 टक्क्यांवर गेलो” असं रोहित पवार म्हणाले.

यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही

“लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही पिपाणी चिन्हासंदर्भात आक्षेप घेतले होते. पण त्यांनी यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. आमचे अनेक उमेदवार जिंकले पण पिपाणी चिन्हाच्या उमेदवाराला मतदान चांगली मिळाली होती. चिन्हाच्या संदर्भात साधर्म्य होतं. त्यामुळे हे पिपाणी चिन्ह गोठवण्यात यावं ही मागणी केली होती. पुढे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार जिंकले होते, त्यांची मत तुम्ही बघा, अनेक जिंकलेल्या महायुतीच्या उमेदवाराना सेम मत पडली आहेत” असं रोहित पवार म्हणाले.

पाच मधला एक मतदार या प्रक्रियेत वगळण्यात आला

“राज्याचे निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना आम्ही भेटलो आणि हे सर्व मुद्दे सांगितले पण त्यांनी यावर काहीच केले नाही. राज्यात एसआयआर मोहीम राबवली आहे. त्यात 2 कोटींहून अधिक मतदारांना वगळण्यात आलं आहे तर त्यांना नोटीस तरी देण्यात आली आहे का? आत्ता या मोहिमेची वेळ का वाढवण्यात आली आहे? पश्चिम बंगाल मध्ये देखील एसआयआर करून विधानसभा निवडणूक ही भाजपला जिंकवण्यात आली” असा आरोप रोहित पवार यांनी केला. आपल्या महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने SIR प्रक्रिया राबविण्यात आली आहे आणि प्रत्येकी पाच मधला एक मतदार या प्रक्रियेत वगळण्यात आला आहे असं रोहित पवार म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us