ज्या आमदाराला आणण्यासाठी शिंदेंनी पाठवलं हेलिकॉप्टर, त्याचीच भरसभेत पत्रकारांना धमकी, म्हणाला बघून घेतो…
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, आमदार शरद सोनवणे यांनी भरसभेत पत्रकारांना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. मी पाहतोच एकदा, माझ्यावर खूप कलमे आहेत पहिल्यापासून असं सोनवणे यांनी म्हटलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी भरसभेत पत्रकारांना धमकीवजा इशारा दिला आहे. आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. पत्रकारांनी धंदा मांडून ठेवला आहे, हे सर्व जण धंदेखोर झाले आहेत, असे म्हणत त्यांनी पत्रकार वाणी यांचे नाव घेत धमकी दिली आहे. “15 ऑगस्ट होऊ द्या, नंतर मी आणि ते आहेच. मी पाहतोच एकदा. माझ्यावर खूप कलमे आहेत पहिल्यापासून. मी तुमच्याकडे पाहणार,” असं वक्तव्य आमदार सोनवणे यांनी केले आहे. त्यामुळे आता आमदार शरद सोनवणे हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले सोनवणे?
आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. पत्रकारांनी धंदा मांडून ठेवला आहे, हे सर्व जण धंदेखोर झाले आहेत, असे म्हणत त्यांनी पत्रकार वाणी यांचे नाव घेत धमकी दिली आहे. “15 ऑगस्ट होऊ द्या, नंतर मी आणि ते आहेच. मी पाहतोच एकदा. माझ्यावर खूप कलमे आहेत पहिल्यापासून. मी तुमच्याकडे पाहणार,” असं वक्तव्य आमदार सोनवणे यांनी केले आहे. त्यामुळे आमदार शरद सोनवणे आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत. तुम्ही नागरिक असाल तर ते तुमच्या घरी, ‘तुम्ही आमची वाट लावता’ अशा शब्दात शरद सोनवणे यांनी सुरेश वाणी यांना भरसभेत धमकी दिली आहे.
कोण आहेत शरद सोनवणे?
शरद सोनवणे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार आहेत. ते 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जॉइंट किलर ठरले होते. सोनवणे यांचा जवळपास सात हजार मतांनी विजय झाला, दरम्यान अपक्ष असूनही विजय झाला म्हणून त्यानंतर सोनवणे यांना आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांचं गाव असलेल्या राजुरीमध्ये थेट हेलिकॉप्टर पाठवलं होतं, याच हेलिकॉप्टरमध्ये बसून शरद सोनवणे हे मुंबईला आले होते. त्यावेळी याची प्रचंड चर्चा झाली होती, आता पुन्हा एकदा सोनवणे चर्चेत आले आहेत.