उद्धव ठाकरेंची साथ हा बडा नेता सोडणार? थेट पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे..

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. ज्यानंतर आता काही आमदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. आमदार सुनील शिंदे ठाकरेंच्या पक्षाला राम राम करून जाणार असल्याची चर्चा आहे. आता त्यावर बोलताना सुनील शिंदे दिसले.

उद्धव ठाकरेंची साथ हा बडा नेता सोडणार? थेट पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे..
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 01, 2026 | 12:57 PM

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठे सुरंग लावले. थेट एकाच वेळी तब्बल 6 खासदारांनी ठाकरे गटातून बंड केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत दावा केला. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना दणका दिला. ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर केली. हा ठाकरेंसाठी धक्का होता. उद्धव ठाकरे बंडखोरी केलेल्या 6 खासदारांच्या मतदार दाैऱ्यावर होते. तिथे त्यांनी सभा घेत बंडखोर खासदारांचा समाचार घेतला. मात्र, मुंबईत येताच त्यांना धक्का बसला. सचिन आहिर यांनी काल यावर प्रतिक्रियाही दिली. सचिन आहिर हे आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे नेते समजले जायचे. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनी खऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

सचिन आहिर यांनी कालच शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज केला. यादरम्यानच आमदार सुनील शिंदे देखील बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती. हेच नाही तर सुनील शिंदे यांच्यासोबतच अन्य 11 आमदार शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर आता आमदार सुनील शिंदे यांनी थेट प्रतिक्रिया दिली.

सुनील शिंदे यांनी म्हटले की, शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चा निराधार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत मी जाणे अशक्य आहे. माझे हितशत्रू वावड्या उठवत आहेत, असेही सुनील शिंदे यांनी म्हटले. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा निराधार आहेत, म्हणत त्यांनी प्रवेशाचा दावा फेटाळून लावला आहे.

सकाळपासून सुनील शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटातील चर्चा सुरू होत्या, अखेर त्यांनी त्यावर भाष्य केले. शिवसेना शिंदे गटातील काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जातंय. राज्यातील राजकारणात काहीतरी मोठे घडू शकते, असे सांगितले जात होते. यादरम्यानच सुनील शिंदे यांच्या बंडखोरीची चर्चा रंगताना दिसली. त्यावर आता त्यांनी भाष्य केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us