AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beer: बिअर पिल्याने काय होते? तुम्ही सुद्धा हैराण व्हाल

Beer threat to Health: अनेक तरुण बिअर पिण्याला पसंती देतात. बिअर प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो असे एक समज आहे. पण बिअर पिल्याने शरीरावर काय परिणाम होतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

Beer: बिअर पिल्याने काय होते? तुम्ही सुद्धा हैराण व्हाल
बिअर पिल्याने काय होते? तुम्ही सुद्धा हैराण व्हाल
| Updated on: Nov 20, 2026 | 12:42 PM
Share

Beer threat to Health: अनेक तरूण थंडगार बिअर पिण्याला पसंती देतात. बिअर प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि तहान भागते असा अनेकांचा मोठा समज आहे. तर बिअर पिल्याने शरीराला पोषक घटक मिळतात. मिनरल्स, व्हिटॉमिन मिळतात असाही दावा करण्यात येतो. पण तज्ज्ञांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. उन्हापासून बचावासाठी आणि तहान भागवण्यासाठी बिअर पिणे फायदेशीर असल्याचे समज सपशेल खोटा असल्याचे तज्ज्ञ सांगतात. उलट बिअर पिल्याने शरीराला हानी पोहचते असा तज्ज्ञांचा दावा आहे.

बिअर पिण्याचे शरिराला तोटे

बिअर पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते, असा गैरसमज आहे. बिअरमध्ये अल्कोहल असते. जे शरीराला आतून कोरडे करते, शरीरात डिहायड्रेशन वाढते. बिअर प्यायल्यानंतर शरीरात पाणी साठत नाही. ते बाहेर पडते. बिअरमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असल्याचा काही जण दावा करतात. तर काही जण बिअर ही आरोग्यदायी असतात असाही तर्क लढवतात. पण बिअर आरोग्यदायी समजून पिणे योग्य नसल्याचे डॉक्टर सांगतात. उन्हाळ्यात अथवा दमट वातावरणात बिअरऐवजी साधे पाणी, लिंबू पाणी अथवा ताज्या फळांचा रस घेणे सर्वोत्तम ठरते.

बिअर पिण्याचे मोठे दुष्परिणाम

बिअरमधील अल्कोहोल शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स बाहेर काडते. यामुळे तहान अधिक वाढते. शरीरात पाण्याची मोठी कमतरता निर्माण होते.

बिअरमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. नियमितपणे बिअर पिल्यास पोटाची चरबी आणि वजन वाढण्याचा धोका अधिक असतो.

बिअर प्यायल्याने शांत झोप लागते हा अजून एक गैरसमज आहे. पण प्रत्यक्षात बिअर प्यायल्याने नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडते.

सातत्याने बिअरचे सेवन केल्यास यकृतावर , लिव्हरवर दुष्परिणाम होतो. त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतात.

बिअर सेवन केल्याने अपचन, गॅस, पोट फुगणे आणि इतर आजार जडतात. पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर: ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. आरोग्यविषयक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...