AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता ज्ञान शिकवायला लागले’, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या मुद्यावर शर्मिला ठाकरे यांचं परखड भाष्य

"राज ठाकरे कदाचित मालवणला जातीलही पण आता उपयोग काय? कारण पुतळाच त्या ठिकाणी पडलेला आहे आणि नवीन पुतळा बांधणार असं बोललं जातंय. त्यामुळे राज ठाकरे नेहमी सांगतात की पुतळे महाराष्ट्रात बांधण्यापेक्षा जे किल्ले महाराज यांनी बांधलेत, त्याचे संवर्धन झालं पाहिजे"

'आता ज्ञान शिकवायला लागले', शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या मुद्यावर शर्मिला ठाकरे यांचं परखड भाष्य
Raj & Sharmila Thackeray
| Updated on: Aug 29, 2024 | 2:57 PM
Share

“मला वाटतं केवळ मनसे असा असा एक पक्ष आहे, जो मराठी कलावंतांसाठी पुढाकार घेत त्यांच्या समस्या मांडण्यासाठी पुढे आला, इतर इतके दिग्गज मोठे पक्ष असून देखील त्यांना कधीही असं वाटलं नाही, मराठी कलावंतांसाठी काहीतरी करावं, यापुढे देखील आम्ही अशाच पद्धतीने मराठी कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. “मला केवळ एवढेच सांगायचे की पुतळा हा पोकळ कसा असू शकतो? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तरी भ्रष्टाचार करणे सरकारने थांबवलं पाहिजे” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

“त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. त्याला जवळपास साडेतीनशे वर्षे झाली आहेत, तो किल्ला अजूनही कोसळला नाही तो जसाच्या तसाच आहे. पण आपले पुतळे कोसळतात ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. “महाविकास आघाडी आता महायुती वरती टीका करतय, पण अस नाहीय की त्यांच्या काळामध्ये पुतळ्यासंदर्भात भ्रष्टाचार झालाच नाही, बलात्कार झालाच नाही, आता ज्ञान शिकवायला लागले. पण त्यांच्या काळातही तीच परिस्थिती होती त्यामुळे तराजूत जर दोघांना मोजलं तर दोघेही समानच आहेत” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

‘यातून सुटका नेमकी कधी होणार?’

“प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार होतोय. नाशिकचे रस्ते असू द्या तिथे लोक जायला धजावत नाहीत नाशिकहून मुंबईत यायचं झालं तर बारा बारा तास लागतात. लोक गाड्या पाठवून देतात पुढे आणि ट्रेनने स्वतः प्रवास करतात अशी अवस्था आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आम्ही आंदोलन केली पण अजूनही त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात यातून सुटका नेमकी कधी होणार?” असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे मालवणला जाणार का?

“राज ठाकरे कदाचित मालवणला जातीलही पण आता उपयोग काय? कारण पुतळाच त्या ठिकाणी पडलेला आहे आणि नवीन पुतळा बांधणार असं बोललं जातंय. त्यामुळे राज ठाकरे नेहमी सांगतात की पुतळे महाराष्ट्रात बांधण्यापेक्षा जे किल्ले महाराज यांनी बांधलेत, त्याचे संवर्धन झालं पाहिजे. त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे त्याचं जतन करा, पुतळा बांधत बसू नका” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.