Narendra Mehta : मिरा-भाईंदरला जैनांची नगरी म्हणता, हॉटेलमध्ये दारु विकता, शाळेत तुम्हाला धर्म लागतो पण..मनसेचा मेहतांवर जोरदार पलटवार VIDEO

Narendra Mehta : नरेंद्र मेहता यांनी मिरा-भाईंदरला जैनांची नगरी म्हटलं आहे. त्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे, काँग्रेस दोन्ही पक्ष त्यांच्याविरोधात आक्रमक झालेत. शाळेत कांदा-लसूण बंदीवर नरेंद्र मेहता ठाम आहेत.

Narendra Mehta : मिरा-भाईंदरला जैनांची नगरी म्हणता, हॉटेलमध्ये दारु विकता, शाळेत तुम्हाला धर्म लागतो पण..मनसेचा मेहतांवर जोरदार पलटवार VIDEO
Sachin Pople-Narendra Mehta
| Updated on: Oct 01, 2026 | 11:44 AM

मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाण्यात परम पूज्य दादा गुरुदेव यांच्या 33 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी आहे असं नरेंद्र मेहता म्हणाले. आमदार, महापौर आणि 9 नगरसेवक जैन असल्याचा दावा त्यांनी केला. शाळेत कांदा-लसूण बंदीवर नरेंद्र मेहता ठाम आहेत. ‘जे होईल ते बघून घेऊ’ म्हणत विरोधकांना नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिलं. मिरा-भाईंदर जैनांची नगरी असल्याच्या भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या दाव्यावरून राजकीय वाद पेटला आहे. सेव्हन स्क्वेअर अकॅडमीत कांदा-लसूणवर बंदी आहे. त्यावरही नरेंद्र मेहता ठाम आहेत. मनसे विभाग अध्यक्ष सचिन पोपळे यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर पलटवार केला आहे. ‘मिरा-भाईंदर ही आगरी-कोळी आणि मराठी बांधवांची भूमी आहे, वाद वाढवण्याचे उद्योग बंद करा’ असा इशारा दिला आहे.

“तुमची दोन हॉटेल्स आहेत. एका हॉटेलमध्ये दारु विकता. तिथे सगळी कंदमुळं विकली जातात. दुसऱ्या हॉटेलमध्ये सेव्हन इलेव्हन क्लबमध्ये असेच प्रकार चालतात. म्हणजे तुम्हाला शाळेत धर्म लागतो. व्यवसायात आणि पैसे कमावण्यासाठी धर्म लागत नाही” अशी टीका सचिन पोपळे यांनी केली. भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर काँग्रेसने भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप केला. मिरा भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता जाणूनबुजून मराठी माणसाला डिवचत असल्याच काँग्रेस युवा जिल्हा अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी आरोप केला. दोन वर्षांत कामांचा हिशोब देण्याऐवजी भाषिक वाद निर्माण केल्याची काँग्रेसची टीका. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा-भाईंदरला 2014 पासून 24 तास पाण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज 15 मिनिटेही पाणी मिळत नसल्याचा काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी दावा केला. ‘आम्ही स्थानिक, मराठी’ म्हणणारे मेहता आता ‘जैन नगरी’ म्हणत आहेत अशी टीका राणे यांनी केली.

Loading...

मेहतांना का सहन करता?

मेहता हे स्वतःला सर्वसमावेशक आणि महाराष्ट्रप्रेमी म्हणतात, मात्र त्यांच्या वक्तव्यांमधून त्यांचा खरा चेहरा समोर येत असल्याचा घणाघात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे. शाळेतील खानपान निर्बंध, मांसाहार बंदी आणि मराठीविरोधी भूमिकेचे आरोप करत, सत्तेच्या गुर्मीत वागणाऱ्या मेहतांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देशमुख यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मेहतांना का सहन करत आहेत, असा सवाल करत मेहतांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us