पडलेल्या पोकलेनचा फोटो, अर्धवट कोपर पुलाचं काम, मनसे आमदार राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट

राजू पाटील यांनी ट्विटरवर कोपर पूलाच्या बांधकामाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पुलाच्या कामादरम्यान पोकलेनचा पडलेला फोटोदेखील त्यांनी शेअर केला आहे (MNS MLA Raju Patil ask question about Kopar bridge).

पडलेल्या पोकलेनचा फोटो, अर्धवट कोपर पुलाचं काम, मनसे आमदार राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्विट
| Updated on: Jan 27, 2021 | 4:31 PM

कल्याण (ठाणे) : डोंबिवलीत कोपर रेल्वे उड्डाण पूलाचे काम सध्या संथ गतीने सुरु आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले तर डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. मात्र, पुलाचं काम संथ गतीने सुरु असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केडीएमसीला टॅग करत कोपर पूल कधी होणार? असा सवाल केला आहे. राजू पाटील यांनी ट्विटरवर कोपर पूलाच्या बांधकामाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पुलाच्या कामादरम्यान पोकलेनचा पडलेला फोटोदेखील त्यांनी शेअर केला आहे (MNS MLA Raju Patil ask question about Kopar bridge).

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेना, भाजप आणि मनसे विकास कामांसाठी आक्रमक होताना दिसत आहे. पत्रीपूलाच्या लोकार्पणानंतर या पूलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे. नागरीकांना दिलासा मिळाला आहे. अशाचप्रकारे कोपर रेल्वे उड्डाणपुलाचे काम डोंबिवलीत सुरु आहे (MNS MLA Raju Patil ask question about Kopar bridge).

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पूलाचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. हा पूल झाला तर डोंबिवलीत वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार आहे. सध्या लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पत्रीपूलाच्या कामानंतर कोपर पूल लवकर करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याच दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी कोपर पूलाच्या कामाकडे लक्ष वेधले. त्यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेला टॅग करत याबाबत ट्विट केलं आहे.

“नियोजनबद्ध काम, चांगली ठेकेदार कंपनी आाणि सक्षम प्रशासन असले तर कामे काही दिवसात होऊ शकतात”, असं राजू पाटील ट्विटरवर म्हणाले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी काही पूलांचे फोटो सुद्धा टाकले आहेत. सोबतच कोपर पुलाच्या कामाची सद्यस्थिती, कामा दरम्यान पोकलेन पडल्याचा फोटो टाकला आहे. पत्री पूल झाला कोपर पूल कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा : ‘मनसे हा परिवार, सहज तुटणार नाही’, 320 पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर राजू पाटालांचं मोठं विधान