भाजपच्या कार्यक्रमात अचानक श्रीकांत शिंदे पोहोचले, म्हणाले, ‘मनामध्ये डिस्टन्स ठेऊ नका’

शिवसेना खासदार आपल्या कार्यक्रमात आलेले पाहून भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्व भाजप कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले (ShivSena MP Shrikant Shinde enter in BJP program).

भाजपच्या कार्यक्रमात अचानक श्रीकांत शिंदे पोहोचले, म्हणाले, 'मनामध्ये डिस्टन्स ठेऊ नका'

कल्याण (पूर्व) : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याणमध्ये भाजपकडून आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात थेट शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहिल्याने अनेक भाजप कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल डिस्टन्सिंग कितीही असलं तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढायला नको, असं शिंदे यावेळी म्हणाले. शिवसेना खासदार आपल्या कार्यक्रमात आलेले पाहून भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्व भाजप कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले (ShivSena MP Shrikant Shinde enter in BJP program).

कल्याण डोंबिवलीला जोडणारा नव्या पत्रीपूलाचे काल (25 जानेवारी) उद्घाटन झाले. पत्रीपुलाचं काम पूर्ण झाल्याचं श्रेय घेण्यावरून शिवसेनेला भाजपाने चुचकारले होते. काल भाजप आणि शिवसेना खासदारांमध्ये पुलाच्या नावावरून चांगलीच जुंपली होती. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र भाजपने कल्याणच्या पत्रीपुलाजवळ नवीन पूल आणि पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाला नामकरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हा कार्यक्रम स्थानिक भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. या चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाव देण्यात आले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रम सुरू असताना अचानक शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांना पाहून भाजपचे सर्व कार्यकर्ते आश्चर्यात पडले (ShivSena MP Shrikant Shinde enter in BJP program).

खासदार श्रीकांत शिंदे यांनी माईक हातात घेऊन चौका संदर्भात भाषण दिले. मला बोलावले नसले तरी मी आलो. सोशल डिस्टन्सिंग किती जरी असली तरी एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवू नका, असं आवाहन त्यांनी भाजपला केले. ज्या ठिकाणी चौकाला नाव देण्यात आले आहे त्याच ठिकाणी पत्रीपुलाचा लोकार्पण सोहळा काल पार पडला होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे राजकारण सुद्धा तापणार आहे.

श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणावर श्रीकांत शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मी कल्याण पश्चिमेत एका कार्यक्रमासाठी जात असताना मला भाजप आमदार रवींद्र चव्हाण दिसले. त्यांना बघून मी पुढे जाणं हे चांगलं वाटणार नाही, म्हणून मी थांबलो”, असं शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘ऊर्जामंत्री आणि हे सरकार निर्लज्ज’, भाजप आमदाराचा घणाघात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI