AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पत्रकार परिषदेपूर्वीच निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड, मोठा राडा

मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोडीची घटना घडली आहे.

मोठी बातमी! पत्रकार परिषदेपूर्वीच निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड, मोठा राडा
मनसेकडून संगणकाची तोडफोड Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 15, 2025 | 3:41 PM
Share

आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यात आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता मोठी बामती समोर आली आहे, ती म्हणजे या पत्रकार परिषदेपूर्वीच  संतप्त मनसैनिकांनी मनसे स्टाईलने निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक फोडले आहेत. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला.  मतदार यादी संदर्भात घोळ असल्या प्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले होते, यावेळी ही घटना घडली आहे.

नेमकं काय आहे  प्रकरण? 

मतदार यादी संदर्भात घोळ असल्या प्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले असताना, निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादी अपडेट करण्याकरिता फक्त एकच कर्मचारी उपलब्ध होता. त्याचबरोबर संपूर्ण मतदार संघामधील मतदार याद्या हाताळण्याकरिता अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या असल्याने मनसे कार्यकर्ते यावेळी प्रचंड संतापले.  तसेच यावेळी अधिकाऱ्यांकडून देखील अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने संतप्त मनसैनिकांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयामधील संगणक फोडले आहेत.

सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मनसे स्टाईल दणका देऊ, मतदार संघातील याद्या अपडेट केल्या नाहीत तर पुन्हा  आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.  गेली अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत, परंतु निवडणूक आयोग जर कोणाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आम्ही काय करायचं? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.  तसेच 149 मतदार संघाबाबत येणाऱ्या काळात मनसे कोर्टात पीएल देखील दाखल करणार आहे, अशी माहिती यावेळी मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी दिली आहे.

विरोधकांकडून निवडणूक आयोगावर आरोप 

दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येत आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला परंतु आधी हा सर्व घोळ दुरूस्त करा अशी मागणी काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा