अमित ठाकरेंच्या खांद्यावर ‘मनसे’ची मोठी जबाबदारी; राज यांनी साधला मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग!

मराठीच्या मुद्यावर नेहमी राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांनी आपले पुत्र अमित ठाकरे यांच्या खांद्यावर आता मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग साधत एक महत्त्वाची जबाबदारी सोपवलीय. आगामी महापालिका निवडणुकीतही अमित सक्रिय राहणार आहेत, असे संकेत त्यांनी दिलेत. आता अमित यांचा राजकारणातील झंझावात कसा राहील, याची उत्सुकता मराठी जणांना लागलीय.

अमित ठाकरेंच्या खांद्यावर मनसेची मोठी जबाबदारी; राज यांनी साधला मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग!
अमित ठाकरे.
| Updated on: Feb 27, 2022 | 1:55 PM

मुंबईः राजकारणाच्या घोड्यावर मांड टाकलेल्या अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या शिरावर मराठी भाषा गौरव दिनाचा योग साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (MNS) मोठी जबाबदारी टाकण्यात आलीय. आता अमित यांच्या खांद्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलीय. विशेष म्हणजे राजकारणात पदार्पण करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरही शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आदित्य यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पेललीच. सोबत ते आता राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही चांगले काम करतायत. आता त्याच वाटेने अमित यांची वाटचाल सुरूय.

मुंबईत मोर्चेबांधणी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडमध्ये आलीय. मनसे नेते अमित ठाकरे सुद्धा या मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 3 शाखांचे उद्घाटन करण्यात आले होते. तसेच त्यांच्या उपस्थितीमध्ये ‘शिवजनसंपर्क अभियानाला’ सुरुवात करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण आणि ते वृक्ष दत्तक घेणे, वाचनालयाला भेट देणे आणि महिला सफाई कामगारांना रेशन किट देणे, असे विविध उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमापू्र्वीच अमित यांच्या खांद्यावर एखादी मोठी जबाबदारी येणार अशी चर्चा सुरू होती. विशेषतः मराठीवरून राजकारण करणाऱ्या राज यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त साधून ही जबाबदारी सोपण्यात आल्याचे समजते.

नाशिकमध्ये विशेष लक्ष

येणाऱ्या काळात राज्यात दहा महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव आदींसह इतर महापालिकांचा समावेश आहे. मात्र, अमित यांनी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातले आहे. या सहा महिन्यांमध्ये त्यांनी नाशिकचे अनेक दौरे केले. पक्ष संघटनेची बांधणी केली. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत अनेक फेरबदल केले. या बदलातही अमित ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांची महत्त्वाची भूमिका होती. अमित यांच्यासह मनसेचे नेते नाशिकमध्ये तळ ठोकून होते. एकंदर हे सारे पाहता अमित यांच्याकडे एखाद्या महापालिकेची जबाबदारी टाकण्यात येते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान