इंग्रजीबद्दल संघाचं मत काय? मोहन भागवत यांची मोठी घोषणा काय?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच केलेले वक्त चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी आम्ही संघात इंग्रजीचा वापर करणार नाही असे स्पष्ट मत मांडले आहे. त्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

इंग्रजीबद्दल संघाचं मत काय? मोहन भागवत यांची मोठी घोषणा काय?
Mohan Bhagwat
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 08, 2026 | 11:53 AM

सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोहन भागवत यांनी सध्याच्या परिस्थिवीर, भाषेवरुन सुरु असलेल्या वादावर आपले मत मांडले आहे. त्यांनी आम्ही संघात इंग्रजीचा वापर करणार नाही. तिथे फक्त भारतीय भाषांचाच वापर करू, अशी घोषणा देखील केली.

नेमकं काय म्हणाले?

इंग्रजी भाषा संघाच्या कार्यपद्धतीत कधी येणार नाही. संघाच्या कार्यपद्धतीचा अंग इंग्रजी होणार नाही. कारण ती परदेशी भाषा आहे. भारतीय भाषा नाही. आम्हाला भारतीय लोकांमध्ये काम करायचं आहे. आज हिंदी आपली मातृभाषा आहे. इंग्रजीत बोलू शकता. पण मातृभाषा बदलत नाही. इंग्रजी जिथे आवश्यक आहे, तिथे त्याचा उपयोग करतो. आमचा कोणत्याही भाषेशी झगडा नाहीये. आपण जे आहोत ते आम्हाला बनून राहायचं आहे. इंग्रजी अशी बोलावी की इंग्रजांनी आपलं भाषण ऐकण्यासाठी तिकीट खरेदी करून आलं पाहिजे. पण याचा अर्थ आपण आपली मातृभाषा विसरलं पाहिजे असं नाही. हेच आमचं म्हणणं आहे. बंगळूरुत हाच कार्यक्रम होता. तिथे कर्नाटक, तामिळनाडूचे लोक होते. त्यातील लोकांना हिंदी नव्हती येत. त्यामुळे मला इंग्रजीत बोलावं लागलं. मी सर्व प्रश्नांची उत्तरं इंग्रजीत दिली. हे आम्ही करतो असे मोहन भागवत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, हिंदू स्वयंसेवक संघ आहे. यूके आणि अमेरिकेत इंग्रजीत बोलावं लागतं. फ्रान्स आणि जर्मनीत इंग्रजी चालत नाही, तिथे हिंदीतच बोलावं लागतं. हिंदू स्वयंसेवक संघाचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा दोन ग्रुप तयार होतात. ज्या देशात इंग्रजी चालते आणि जिथे फक्त हिंदी चालते असे. ही फॅक्ट आहे. आम्ही कितीही इंग्रजी बोललो तरी भारतीय लोकांशी संवाद साधायचे असेल तर आपली मातृभाषा आणि हिंदीच चालते. इंग्लिशशी आमचं वैर नाही. जिथे इंग्रजी शिवाय काम होत नाही तिथे इंग्रजीने आम्ही काम चालवतो. पण संघातच इंग्रजी आणण्याचं काम आम्ही कधी करणार नाही. संघात फक्त भारतीय भाषाच चालतील.

संघाकडे पैसे कुठून येतात?

संघाडकडे पैसे कुठून येतात यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले, संघाला पैसा येतो कुठून हा प्रश्न. मी सांगतो स्वयंसेवक संघ चालवण्यासाठी गुरु दक्षिणा देतात. सेवा चालवण्यासाठी आम्ही समाजाकडून मदत घेतो. पण विश्वास वाटत नाही. आम्हाला पैसा कमी येतो. जेवढा पैसा वाचवायचा तेवढा वाचवतो. आम्ही प्रवास करतो. त्यावेळी जेवणासाठी बाहेर खर्च करत नाही. आम्ही घरांमधून जेवण मागवतो. आम्ही हॉटेलात राहत नाही. घरात किंवा कार्यालयात राहतो. समाजाचा जो नॉर्मल बजेट आहे. त्यापेक्षा आमचा बजेट कमी आहे. आम्ही आमच्यात संघ घेऊन भेटतो. आणि प्रत्यक्ष पाहिल्याने लोकांचा भ्रम दूर होतो. आत येऊन तुम्ही संघाला पाहा असं सांगतो. एक चमच साखर खालल्यावर साखर गोड आहे तेव्हाच कळते.

Follow Us