AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोशी दुर्घटनेत मोठा खुलासा! केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला; मग वरचे दोन मजले उभे राहिले कसे?

Pune Building Collapse : मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली. या इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला देण्यात आल्याचे समोर आले आहे.

मोशी दुर्घटनेत मोठा खुलासा! केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला; मग वरचे दोन मजले उभे राहिले कसे?
Moshi Building CollapseImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 11, 2026 | 2:35 PM
Share

पुण्यातील मोशी कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली. जी तीन मजली इमारत कोसळून एका कामगाराचा जीव गेला आणि आठ कामगारांच्या जीवाशी तब्बल 65 तास खेळ झाला. त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारतीच्या केवळ तळमजल्यालाचं पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलाय. मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केवळ तळमजल्याला पूर्णत्वाच्या दाखल्याची परवानगी

मोशी कचरा डेपो परिसरातील इमारतीला महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेला पूर्णत्वाचा दाखला समोर आलाय. 27 जुलै 2023 ला या ऍडमिन बिल्डींगला रेकॉर्ड प्लॅन नुसार पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला. मात्र या दाखल्यात फक्त तळमजल्याचाचं उल्लेख आहे. मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही का? असा प्रश्न बांधकाम विभागाकडे विचारला असता, पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नसल्याचं शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितलं. त्यामुळे वरच्या दोन मजल्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे यातून स्पष्ट झालं.

वरील दोन मजले कुणाच्या परवानगीने बांधले?

आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या पर्यावरण विभागाने 26 जुलैला सुधारित बांधकामासाठी परवानगी मागितली आणि त्यासाठी चोवीस तासांतच म्हणजे 27 जुलैला पूर्णत्वाचा दाखला देण्याची तत्परता पालिकेच्या बांधकाम विभागाने दाखवली. म्हणजे तीन मजली इमारतीची पाहणी न करताच, बांधकाम विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिला का? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. यासह आणखी काही मोठे प्रश्न निर्माण झालेत. वरचे दोन मजले नेमके कोणाच्या परवानगीने उभारले गेले? पूर्णत्वाचा दाखला नसताना त्या मजल्यांवर कँटीन आणि कॉन्फरन्स रूम कशी सुरू झाली? त्या जागेवर कामगारांना काम करण्याची परवानगी कोणी दिली?

आता जर केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला असेल, तर वरच्या दोन मजल्यांवर झालेलं बांधकाम, त्याचा वापर, अशात झालेली दुर्घटना, त्यातील मृत्यू आणि कामगारांच्या जीवाशी झालेला खेळ याची जबाबदारी नेमकी कोणाची? 2023मध्ये परवानगी मागणाऱ्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची की कंत्राटदार कंपनीची ? हा प्रश्न समोर आला आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे