AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप मोठ्या यातना भोगल्या संघर्ष केला.. कोर्टात पोहोचताच ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया, थेट..

खासदार ओमराजे निंबाळकर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकाल आज लागणार आहे. काही वेळातच हा निकाल पुढे येईल. यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

खूप मोठ्या यातना भोगल्या संघर्ष केला.. कोर्टात पोहोचताच ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया, थेट..
Omraje Nimbalka
| Updated on: Jun 20, 2026 | 10:49 AM
Share

ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडातील निकाल आज कोर्ट देत आहे. या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. तब्बल 20 वर्षानंतर हा निकाल लागत आहे. ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबिय कोर्टात दाखल झाले. यासोबतच पद्मसिंह पाटील हे देखील कोर्टात पोहोचले. यावेळी थेट रूग्णवाहिकेने ते कोर्टात दाखल झाले. त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक मोठी टीमही कोर्टात पोहोचली. सर्व 9 आरोपींनी कोर्टाने दाखल होण्याचे आदेश दिले. सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत. 3 जून 2006 रोजी मुंबईहून धाराशिवकडे निघाले असताना पवनराजे यांची हत्या करण्यात आली. आता या प्रकरणातील निकाल कोर्ट आज देणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. 9 आरोपींपैकी 7 आरोपी कोर्टात आदेशानंतर हजर झाले. पवनराजे आणि त्यांच्या चालकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

बिहार पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी पिंटू सिंह यालाही कोर्टात हजर करण्यात आले. अगदी थोड्याचवेळा कोर्टाकडून या प्रकरणात निकाल दिला जाईल. कोर्टात पोहोचल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, या 20 वर्षात खूप मोठ्या यातना भोगल्या आहेत. संघर्ष केला. दोन्ही कुटुंबाने यातना भोगल्या आहेत.

जी न्यायालयीन प्रक्रिया होते, त्यानंतर न्यायालयाने आज निकालासाठी तारीख ठरवली. न्याय देवतेकडून न्यायाची अपेक्षा आहे. पद्मसिंह पाटलांना साडेतीन महिन्यात जामीन मिळाला होता. या प्रकरणातील सर्व आरोपी जामिनावर सध्या बाहेर आहेत. अखेर तब्बल 20 वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर न्यायालय या प्रकरणात निकाल देत आहे. ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला या निकालाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

यादरम्यानच ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. बाकी बंडखोरी केलेले 5 खासदार सुरक्षितस्थळी आहेत. याला ओमराजे निंबाळकर अपवाद आहेत. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा दिवस महत्वाचा आहे. न्याय मिळावा, असे ते वारंवार बोलताना दिसत आहेत. कालच त्यांनी पक्षांतराच्या मुद्द्यात भावना जाहीर केल्या होत्या.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी